सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनी साखरवाडी येथे श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघ व आजी-माजी सैनिक संघटना रक्षक ग्रुप कार्यालयाचे उदघाटन माजी सरपंच श्री. विक्रमसिंह भोसले यांच्या हस्ते सपन्न..
ग्रामपंचायत साखरवाडी कार्यालय कडे 15 ऑगस्ट 2024 चे औचित्य साधुन कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असता त्यांना तत्काळ उपलब्ध करून दिली व या कार्यालयांचे उदघाटन साखरवाडी गावचे माजी सरपंच श्री. विक्रमसिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमा वेळी श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघ साखरवाडी, चे संस्थापक अध्यक्ष
खानविलकर-नाना, सचिव- कुचेकर सर,आजी-माजी सैनिक संघटना रक्षक ग्रुप साखरवाडी चे अध्यक्ष-शिवाजी पवार उपाध्यक्ष –दिपक खलाटे, सरपंच - रेखाताई जाधव, उपसरपंच-अक्षय रुपनवर, ग्रा. सदस्याविक्रम ढेंबरे,गौरी औचरे,मयुर लोखंडे, माजी सैनिक रक्षक ग्रुप आणि जेष्ठ नागरिक संघाचे सभासद व साखरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments