सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/वैभव जगताप
साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी.
साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात आजचा नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.आज शाळेला सुट्टी नसल्याने सर्वच शाळकरी मुले विशेषतः मुली नाराज होणार हे ओळखून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे यांनी कालच शाळा सकाळची घेण्याचा निर्णय घेऊन सर्व विद्यार्थ्यांना आज रंगीत पारंपरिक वेषात येण्यास सांगितले.त्याप्रमाणे सर्व मुले मुली आकर्षक वेशभूषेत शाळेत आली.मुलांना पतंग दोरे आणावयास सांगितले होते त्याप्रमाणे मुले पतंग दोरे घेऊन आली.शालेय वेळापत्रकातील शेवटचे दोन तास या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आले होते.प्रारंभी मुख्याध्यापिका सौ जगदाळे यांनी नागदेवतेची पूजा केली.त्यानंतर सर्व मुलींनी विविध पारंपरिक गाण्यांवर फेर धरले.झिम्मा फुगड्या झाल्या.पिंगा घातला.बाहेरच्या मैदानावर मुलांनी आपापल्या पतंग उंच उंच आकाशात भिरकावल्या.सर्वत्र उत्साहाचे वातावरण झाले होते.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे तसेच शालेय सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य व इतर सर्वच शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी मुलांसमवेत सहभागी होऊन संपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.परिसरातील पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments