सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
कुरवली खुर्द येथे विवाहित महीलेची आत्महत्या.
दि.८/८/२०२४ रोजी कुरवली खुर्द ता.फलटण जि.सातारा येथील विवाहित महीलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली.मिळालेली माहिती खालील प्रमाणे..
१६/३/२०२४ रोजी ते दि ५/८/२०२४ दरम्यानच्या कालावधीत वेळोवेळी फलके वस्ती मोई तालुका खेड जिल्हा पुणे येथे व कुरवली खुर्द तालुका फलटण जिल्हा सातारा येथे फिर्यादी यांची मुलगी मयुरी सुरज गोळे वय २७ वर्ष हीस तिचा नवरा सुरेश मनोहर गोळे यांनी वेळोवेळी चारित्र्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली आहे त्याचप्रमाणे तिची ननंद अर्चना राहुल राजगुडे,सासू सुनंदा मनोहर गोळे व सासरा मनोहर सदाशिव गोळे यांनी सुद्धा तिचा २० लाख रुपये हुंड्यासाठी व चारित्र्याच्या कारणावरून वरील प्रमाणे शारीरिक व मानसिक छळ करून तिला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद दि.८/८/२०२४रोजी प्रभाकर बाळासो जाधव वय ६० वर्षे रा.देशमुखवाडी ता..माळशिरस जि.सोलापुर यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेली आहे.सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments