सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सासकल येथील सुपर केन नर्सरीला कृषी अधिकाऱ्यांची भेट.
फलटण - ऊस पिकातील क्षेत्र वाढत असताना उत्पादन खर्च उसाची एकरी 100 टन लक्ष ठेवून सासकल ता फलटण जिल्हा सातारा येथील गावातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुपर केन नर्सरी तयार करण्यात आले आहे
मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री पवार फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये कृषी विभागाचे विविध उपक्रम व मोहीम सुरू आहे
कृषी विभागाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पिकाचे उत्पादनामध्ये वाढ करणे हा प्रमुख उद्देश्य असल्याचे तसेच फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड शेतकरी करत असतात उसाची लागवड सुपर केन नर्सरी तयार करून उसाची रोपाची लागवड करूनच उसाचे पीक घेण्याबाबत आव्हान यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी फलटण सुहास रणसिंग यांनी केले
यावेळी तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांनी सुपर केन नर्सरी द्वारे उसाची रोपे तयार करून लागवड केल्यामुळे लागवड खर्च, बेण्यावरील खर्च, योग्य रोपे संख्या ठेवणे, सशक्त रोपे तयार होत असल्यामुळे रोग किडीला चा प्रादुर्भाव दिसून येत नाही तसेच उसाची लागवड रोपे द्वारे झाल्यामुळे योग्य रोपे संख्या ठेवता येते, रोपाची लागवड जोमदार वाढ व फुटव्यांची संख्या योग्य मिळत असल्यामुळे परिणामी उसाचे उत्पादन वाढण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सुपर केन नर्सरी तयार करून घरच्या घरी कमी खर्चामध्ये सुपर केन नर्सरी द्वारे उसाची लागवड करावी असे आवाहन यावेळी दत्तात्रय गायकवाड तालुका कृषी अधिकारी फलटण यांनी केले
सासकल गावामध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली 5 शेतकऱ्यांनी सुपर केन नर्सरी द्वारे ऊस रोपवाटिका तयार करण्यात आले आहे
ऊस लागवड साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उसाची लागवड करण्याबाबतची चर्चा गावात सुरु आहे
यावेळी संतोष मुळीक प्रगतशील शेतकरी व मच्छिंद्र मुळीक प्रगतशील शेतकरी सासकल यांच्या सुपर केन नर्सरीला भेट देऊन त्यांनी कृषी विभागाच्या सुपर केन नर्सरी मोहीम मध्ये सहभागी झाल्याबद्दल यावेळी त्यांचे कृषि विभागाच्या वतीने अभिनंदन केले
तसेच संतोष मुळक यांनी सुपर केन नर्सरी तयार करण्यासाठी कृषि सहायक व कृषी अधिकाऱ्याचे प्रत्यक्ष भेट त्यांनी देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यामुळे मी सुपर केन नर्सरी तयार करण्यामध्ये यशस्वी झालो
ऊसाची संपूर्ण लागवड ऊस सुपर केन नर्सरी द्वारे रोपाची 5 फूट सरी व 2 फूट अंतरावर 1 रोप अश्या पद्धतीने ऊस लागवड नियोजन केले आहे
शेतकऱ्यांनी सुपर केन नर्सरी द्वारे ऊस लागवड करणार असेल तर माझ्या मोबाईल नंबर 8806640361 वर संपर्क करण्याबात सांगितले नर्सरी तयार करण्याची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणार असल्याचे सांगितले
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रणसिंग तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड मंडळ कृषी अधिकारीविडणी शहाजी शिंदे, कृषी पर्यवेक्षक विडणी -1अशोक जगदाळे कृषी पर्यवेक्षक विडणी 2अजित सोनवलकर कृषी सहाय्यक सासकल सचिन जाधव तसेच सासकल गावातील पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments