सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/प्रतिनिधी
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे वैभव पवार यांची उमेदवारीची मागणी.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी सुरू असताना २५५ फलटण-कोरेगाव राखीव मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी साखरवाडी,खामगाव गावचे युवा नेते वैभव शंकर पवार यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष सौ प्रतिभाताई शिंदे यांच्याकडे आज उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला
वैभव पवार यांना युवकांचा वाढता प्रतिसाद असून पक्षाने संधी दिल्यास ही निवडणूक पुर्ण ताकतीने लढणार असल्याचे वैभव शंकर पवार यांनी यावेळी सांगितले

Post a Comment
0 Comments