सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/वैभव जगताप
साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत भव्य रॅली चे आयोजन.
साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात हर घर तिरंगा , घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत भव्य रॅली चे आयोजन आज करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापासून सलग गेली ३ वर्षे हा उपक्रम शासनामार्फत राबवला जातो.विद्यालयाच्या या रॅली मध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले. विविध क्रांतिकारक व समाजसुधारकांच्या वेष भूषेतील काही विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच घोड्यावर स्वार तिरांगाधारी भारतमाता सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होते.स्पीकर्स वरून सर्वांना १३ ते १५ ऑगस्ट २०२४ असे ३ दिवस सर्वांनी आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकावन्याविषयी आवाहन करण्यात येत होते.ध्वजसंहिता सांगितली जात होती.अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या या रॅलीत साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक श्री राजेंद्र शेवाळे व कौशल भोसले यांनी सहभागी होऊन उपक्रमाचे कौतुक केले.साखरवाडी विद्यालय प्राथमिक विभागाचेही विद्यार्थी विद्यार्थिनी पुढे या रॅलीत सहभागी झाले. साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे आणि पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत यांनी संपूर्ण रॅली चे नियोजन केले.त्यांना श्री रोहिदास गावित , श्री कमलाकर गांगुर्डे , श्री प्रशांत रासकर , श्री महादेव चव्हाण , तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी उत्तम सहकार्य केले.

Post a Comment
0 Comments