Type Here to Get Search Results !

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्था अध्यक्ष श्री धनंजय दादा साळुंखे पाटील यांचे शुभहस्ते ध्वजारोहण.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

प्रतिनिधी/साखरवाडी 

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्था अध्यक्ष श्री धनंजय दादा साळुंखे पाटील यांचे शुभहस्ते ध्वजारोहण.     


             

भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन संपूर्ण भारत देशभर साजरा होत असताना साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातही ध्वजारोहणाचा सोहळा साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला.  संस्थेचे संचालक माननीय श्री राजेंद्र शेवाळे , श्री राजेंद्र भोसले , श्री कौशल भोसले यांचीही प्रमुख उपस्थिती होती .विद्यालयातील एन. सी. सी. , आर. एस. पी. , गर्ल गाईड, स्काऊट पथकातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदर नेत्रदीपक संचलन केले.यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शुभहस्ते विद्यालयातील मंथन परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.सातारा येथील न्याब या संस्थेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी व विद्यालयासाठी मिळालेल्या बक्षिसांचे  वितरण करून त्यांचे कडून आलेले चष्मे वितरीत करण्यात आले.राष्ट्रीय स्तरावर बॉक्स लंगडी खेळात विजेतेपद मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेत खेळायला जाणाऱ्या आसना जगदाळे या विद्यार्थिनीला सन्मानित करून शुभेच्छा दिल्या. श्री धनंजय दादा यांनी या प्रसंगी सर्वांना संबोधित केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ऊर्मिलाताई जगदाळे व पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन झाले.प्रास्ताविक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत यांनी केले.आभार श्री सुनील भोसले सरांनी मानले.विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments