Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा महिला पोलीसांसाठी आयोजित केला मंगळागौर/नागपंचमी कार्यक्रम.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सातारा जिल्हा महिला पोलीसांसाठी आयोजित केला मंगळागौर/नागपंचमी कार्यक्रम.


भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावण महिन्यापासुन

| पारंपारिक सणांची सुरुवात होते. त्यापैकी सर्व महिलावर्गामध्ये उत्सुकता असते ती मंगळागौर/नागपंचमीच्या

| सणाची...

यामध्ये महिला पारंपारिक नऊवारी पोशाख, दागिने परिधान करुन वेगवेगळे खेळ खेळतात.

महिला पोलीस कर्तव्य बजावत असताना सण साजरे करण्याच्या आनंदापासुन वंचित राहु

| नयेत म्हणुन मा. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक,

| सातारा यांचे संकल्पनेतुन मंगळागौर/ नागपंचमी या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. भाग्यश्री दोशी (मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या पत्नी) यांनी मंगळागौर पुजा

| करुन केले. नमुद कार्यक्रमाकरिता सातारा जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी यांच्या पत्नी यांना देखील आमंत्रित

केले होते.

सौ. भाग्यश्री दोशी, मा. डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती आश्लेषा

| हुले, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सर्व पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस अधिकारी, पोलीस

अधिकारी यांच्या पत्नी, तसेच महिला पोलीस अंमलदार यांनी स्वरुप सखी मंडळ, सोलापुर यांच्यासोबत अनेक

प्रकारच्या फुगड्या, सुप, लाटणे, मुसळ यासारख्या रोजच्या जीवनात वापरात असणात्या गृहोपयोगी

| साहित्यासोबत मंगळागौरीचे खेळ उत्स्फुर्तपणे खेळले. मंगळागौर/नागपंचमी च्या खेळातील आनंदासोबतच

| व्यायामदेखील कसा होतो याबाबत स्वरुप सखी मंडळ, सोलापुर यांनी उत्कृष्टपणे समजावुन सांगितले.

महिला पोलीसांना कर्तव्य बजावत असताना कुटुंबासोबत सण साजरे करता येत नाही, परंतु मा.

डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी पदभार स्विकारल्यापासुन महिला पोलीसांकरिता

पोलीस कुटुंब प्रमुख म्हणुन अतिशय उल्लेखनीयरित्या पारंपारिक सणांचे औचित्य साधुन कार्यक्रमाचे आयोजन

| केले आहे. त्यामुळे महिला पोलीस वर्गामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

नमुद कार्यक्रम आयोजनाकरिता मा. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. डॉ. वैशाली

| कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखली श्रीमती आश्लेषा हुले, पोलीस उपअधीक्षक,

आर्थिक गुन्हे शाखा, पो.उप निरीक्षक सुवर्णा काटकर, श्वेता पाटील, माधुरी देशमुख, म.पो.हवा. मोना निकम,

पो. हवा. नाचण, मुनीर मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments