Type Here to Get Search Results !

बंद केलेल्या एस टी पूर्ववत सुरू करणेबाबत साखरवाडी ग्रामस्थांचे फलटण आगर प्रमुखांना निवेदन..!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ हरिदास सावंत (सर) 

बंद केलेल्या एस टी पूर्ववत सुरू करणेबाबत साखरवाडी ग्रामस्थांचे फलटण आगर प्रमुखांना निवेदन..!


साखरवाडी साठी संध्याकाळी ६ वाजताची बंद केलेली स्वारगेट ते साखरवाडी एस. टी.पूर्ववत चालू करावी आणि साखरवाडी ते लोणंद शटल सेवा चालू करून साखरवाडी तील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी अशा आशयाचे निवेदन आज साखरवाडी ग्रामस्थांचे वतीने फलटण आगार प्रमुख श्री वाघमारे साहेबांना देण्यात आले.यापूर्वी दिलेल्या निवेदना कडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले बाबत यावेळी निषेध व्यक्त केला.आगारप्रमुखानी यावेळी लवकरच याबाबतीत सुयोग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी बोलताना ग्रामस्थांतर्फे श्री हरिदास सावंत सर यांनी येत असलेल्या अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री विक्रमसिंह भोसले ,  माणिक आप्पा भोसले ,विद्यमान उपसरपंच श्री विक्रम ढेंबरे, सदस्य श्री अक्षय रुपनवर तसेच श्री अरविंद किंकर , महेश वाणी , बाळासाहेब भोसले , संग्राम औचरे , दिलीप बाबा पवार , वसंतराव जाधव , संजय चव्हाण , बाळासाहेब भोसले ( वारकरी ) , दादा गायकवाड , राजेंद्र गाडे , आरीफ मणेर , पत्रकार किसन भोसले , सचिन भैया पवार , संपत पवार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments