सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण वैभव जगताप
सातारा जिल्ह्यामध्ये दरोडा, चैन स्नॅचिंग, घरफोडी करणाऱ्या टोळीच्या सातारा पोलिसांनी मुद्देमालासह आवळल्या मुसक्या.
( स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई)
नूतन पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची
धडाकेबाज कारवाई, १ दरोडा, ०८ चैन स्नॅचिंग, ०३ जबरी चोरी, ०८ घरफोडी चोरी, ०३
' चोरी असे एकुण २३ गंभीर गुन्हे करणारी टोळी निष्पन्न करुन ५२ तोळे १ ग्रॅम ५३०
मिली (अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने चालु बाजार भावाप्रमाणे ५२,००,०००/-
रुपये व गुन्हयात वापरलेली ५०,०००/- रुपये किंमतीची एक मोटार सायकल, गुन्हा
करताना वापरलेला कोयता असा एकुण ५२,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक
सातारा यांनी सातारा जिल्हयामध्ये घडणारे दरोडा, चैन स्नॅचिंग, जबरी चोरी वगैरे गुन्हे उघड करण्याच्या
सूचना अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे श्री
अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक स्था. गु.शा सातारा यांच्या
अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करुन त्यांना सदर बाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, सराईत
गुन्हेगार सचिन यंत्र्या भोसले रा. फडतरवाडी ता. जि. सातारा याने त्याचे साथीदारांसोबत सातारा जिल्हयात
दरोड, चैन स्नॅचिंग, घरफोडी असे बरेच गुन्हे केले असून तो त्याचे साथीदारासह जिहे ता. जि. सातारा येथे येत-
जात आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तपास पथकास सदर ठिकाणी जावून आरोपींना पकडुन पुढील
कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे विश्वास शिंगाडे पोउनि व त्यांच्या तपास पथकाने जिहे परिसर
येथे वेळोवेळी जावून त्याठिकाणी सापळा लावून आरोपी सचिन यंत्र्या भोसले व त्याचे साथीदारांची माहिती
काढुन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पथकास चकवा देत होता, परंतु तपास पथकाने 'पाठपुरावा
करुन त्या भागात वेषांतर करुन अहोरात्र पेट्रोलींग करुन व गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन
दिनांक ०७/०७/२०२५ रोजी जिहे गांवात सापळा लावून जिवाची पर्वा न करता त्याच्या मोटार सायकलचा
पाठलाग करुन त्यास शिताफीने पकडले. स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासास असणारा मसूर पोलीस ठाणे
गुरनं २२५ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३९ (४), ३०५, ३०९ (४), ६२,३ (५) हा
गुन्हा त्याने केला असल्याचे निष्पन्न करुन त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक केली, तसेच सदर जबरी चोरीचा
गुन्हा दरोडयाचा गुन्हा असल्याचे निष्पन्न केलेले आहे.
(सदर गुन्हयाचा महाराष्ट्र शासन गृह विभाग परिपत्रक क्र. व्हीआयपी - ०७२३/प्र. क्र. ९९/पोल- १३
दिनांक १४ मार्च २०२४ अन्वये दिलेल्या सुचनांचे पालन करुन तपास करत असताना गुन्हयातील आरोपी
याने सातारा जिल्हयातील सराफ दुकानदार यांना चोरी केलेल्या नमुद गुन्हयातील मोठया प्रमाणात सोन्याचे
दागिने दिले असल्याचे सांगितल्याने तपास पथक सराफांच्याकडे तपास करत असताना सराफ सुवर्णकार
समितीचे उमेश बु-हाडे रा. पुणे प्रथमेश नगरकर रा. पुणे शशिकांत दिक्षित रा. सातारा यांनी विविध मार्गाने
तपासकामात अडथळा निर्माण करुन, गुन्हयातील निष्पन्न सोनारांची दिशाभूल करुन त्यांच्यावर दबाव टाकुन
गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत होवू नयेत म्हणुन प्रयत्न केले व चोरीचे सोने घेणाऱ्या
सोनारांना अभय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सातारा जिल्हयातील कष्टकरी गोरगरीब लोकांचे चोरीस
गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यामध्ये अडथळा निर्माण झाला होता, परंतु तपास पथकाने कौशल्याने
तपास करून विविध गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मोठया प्रमाणात हस्तगत केले आहेत)
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये पथकाने तपासा दरम्यान अटक आरोपी सचिन यंत्र्या भोसले व त्याचे
इतर ७ साथीदार यांनी सातारा जिल्हयामध्ये ९ दरोडा, ०८ चैन स्नॅचिंग, ०३ जबरी चोरी, ०८ घरफोडी
चोरी, ०३ इतर चोरी असे एकुण २३ गुन्हे केल्याचे निष्पन्न केले. तसेच गुन्हयाच्या तपासामध्ये अटक आरोपी
याच्याकडून चोरीचे सोने घेणारे दोन सोनारांना अटक करून नमूद गुन्हयांमधील चोरीस गेलेल्या सोन्याच्या
दागिण्यापैकी ५२ तोळे १ ग्रॅम ५३० मिली (अर्धा किलो) वजनाचे सोन्याचे दागिने चालु बाजार भावाप्रमाणे
५२,००,०००/- रुपये व गुन्हयात वापरलेली ५०,०००/- रुपये किंमतीची एक मोटार सायकल, गुन्हा
करताना वापरलेला कोयता असा एकूण ५२,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Post a Comment
0 Comments