सह्याद्री निर्भिड न्यूज
खामगाव/दादा जाधव
खामगाव गावातील आ.सचिन पाटील यांच्या हस्ते कातकारी समाजाचा घरकुल लोकार्पण सोहळा संपन्न..
आज खामगाव ता. फलटण येथील कातकाडी वस्तीतील आदिवासी समाजातील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा घरकुलाचा प्रश्न ऐरणीवर होता
गत विधानसभेच्या निवडणुकीवेळी मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तीवरील नागरिकांना जागेसहित घरकूल देण्याचे आश्वासन दिलेले होत त्याचा वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला व प्रधानमंत्री जण मन घरकुल योजनेअंतर्गत खामगाव येथील या नागरिकांना आज जागेसहित घरकुल बांधून दिले त्याचे आज लोकार्पण करण्यात आले. लोकसेवेचं काम झाल्यानंतर जो आनंद मिळतो तो इतर कश्यातही मिळणार नाही. मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कायम माझ्या जनतेच्या पाठीशी आहे. या घरकूल योजने बरोबर नागरिकांनी शासनाच्या इतर योजनेचा देखील लाभ घ्यावा जिथे कुठे अडचण असेल तिथे आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करा आपले कोणतेही काम असो ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन दिले या कार्यक्रमास फलटण प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, जेष्ट नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, महानंद चे माजी उपाध्यक्ष डी के पवार, युवा नेते विक्रम आप्पा भोसले, सिराज भाई शेख, अमोल खराडे, राजेंद्र कुचेकर, गणेश पिसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment
0 Comments