सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/दादा जाधव
साखरवाडी येथील सरदार वल्लभभाई हायस्कूल च्या वर्धापन दिनानिमित्त लक्ष्मीतरू झाडांचे व गणवेश वाटप.
साखरवाडी ता.फलटण येथील सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चा दि.१ ऑगस्ट रोजी साजरा झाला वर्धापन दिन,लोकमान्य टिळक पुण्यतिथी, व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त प्रशाले मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर व रविंद्र टिळेकर सर यांच्या सौजन्यातून लक्ष्मीतरू झाडांचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रभाकर जगताप यांनी लक्ष्मीतरू झाडांचे महत्व पटवून सांगितले
दानशूर कै. सखुबाई धोंडीबा पवार प्रतिष्ठाण साखरवाडी चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दिलीप (बाबा ) पवार व सहकार्यां मार्फत गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले गणवेश वाटप सहकार्या बद्दल सुदर्शन जाधव,शेखर निकम,उमेश पवार, स्वप्नील रूपनवर, माऊली गायकवाड, सुशील पवार यांचे दिलीप बाबा पवार यांनी आभार मानले
दिलीप (बाबा ) पवार व कुटुंबीयांनी शाळेला दान केलेल्या जागेबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रभाकर जगताप यांनी विशेष कौतुक केले
या कार्यक्रमा वेळी साखरवाडीचे युवा उद्योजक संजय भोसले,अभयसिंह नाईक निंबाळकर, स्कूल कमिटीचे व्हा.चेअरमन बापूसाहेब निंबाळकर ,श्रीराम साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन नितीन भोसले,
हुंबरे सर,सागर रूपनवर,विकास जाधव,सुदर्शन जाधव, हिंदुराव वारे व प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments