Type Here to Get Search Results !

श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पतंग स्पर्धा उत्साहात संपन्न,नितीन निंबाळकर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पतंग स्पर्धा उत्साहात संपन्न,नितीन निंबाळकर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी.



फलटण : पै.पप्पूभाई शेख मित्र मंडळाच्या वतीने श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळ पतंग स्पर्धेचे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नितीन निंबाळकर, द्वितीय क्रमांक नरेश पालकर, तृतीय क्रमांक यशराज निंबाळकर, चतुर्थ क्रमांक शुभम बाबर यांनी पटकावला, या स्पर्धेमध्ये एकूण ५५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. 

प्रारंभी सकाळी ०९ वाजता सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मा.नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, मा.नगरसेविका सौ.प्रगती कापसे, पै.पप्पूभाई शेख, चंद्रकांत पवार, अरुण आंबोले, किशोर देशपांडे, अविनाश पवार, भाऊ कापसे, योगेश शिंदे, वजीरभाई आत्तार, जमशेद पठाण, असिफ पठाण, शाकिर महात, विशाल तेली, सुहास तेली, श्रीकांत पालकर, चक्रधर कापसे, अमोल काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी नगरसेवक पै.सलीमभाई शेख, मा.नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, मा.नगरसेवक किशोर पवार (गुड्डू), भाऊ कापसे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक ४ हजार रुपये रोख व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये रोख व ट्रॉफी, तृतीय क्रमांक २ हजार रोख व ट्रॉफी, चतुर्थ क्रमांक १ हजार रुपये रोख व ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेला पंच म्हणून फिरोज शेख, दिलीप चवंडके, दत्ता जाधव, जाफर आत्तार, रोहिदास पवार यांनी काम पाहिले.

या स्पर्धेचे आयोजक पै.पप्पूभाई शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. या स्पर्धा पार पाडण्यासाठी पै.पप्पूभाई शेख मित्र मंडळ यांच्या वतीने पै.पप्पूभाई शेख, फिरोज शेख, अर्षद शेख, संजय कापसे, वसीम शेख, बंटी हाडके, श्रीकांत पालकर, नंदू चवंडके, साजिद डांगे, सोहेल डांगे, आबताब मणेर, मेनुद्दीन सय्यद, शादाब झारी, तन्वीर मोमीन, जफर आतार, जॉन्टी शेख, गोविंद मोरगावकर, विनायक परदेशी, वसीम शेख, अनिल वाडकर, नरेश पालकर, जावेद उर्फ सोन्या शेख, सनी पवार, नितीकेश राऊत, नाईद शेख, गणेश सतुटे, अभि निंबाळकर, आदित्य ननवरे, संग्राम पवार, विकी पवार, राजेंद्र कर्वे, गणेश कर्वे, अजिंक्य राऊत, रोहित शिंदे, इम्रान शेख, मोबेन शेख, रिजवान शेख, रामभाऊ गाढवे, जाहिद डांगे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments