सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
जिल्हा बँकेला सर्वांत मोठी रोबो बँक बनवणार- आ. रामराजे
शेतकऱ्यांना ठिबकसाठी बँकेतर्फे अनुदान देणार
सातारा : नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे याकरिता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
या वेळी बँकेचे मार्गदर्शक संचालक व विधानपरिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर (महाराज साहेब ) यांनी
“सर्वांच्या प्रयत्नांमुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक जगातील सर्वात मोठी ‘रोबो बँक’ म्हणून नावारूपाला येईल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अध्यक्ष खा. नितीनकाका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, तसेच जेष्ठ सदस्य व माजी सहकार मंत्री मा. बाळासाहेब पाटील यांसह सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments