सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
तासवडे टोलनाक्याजवळील एस. टी. बस मधील व्यक्तीस मारहाण करून लुटणाऱ्या आरोपीस तळबीड पोलिसांनी केले जेरबंद
(स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई.)
(पोलीस अभिलेखावरील आरोपींनी तळबीड पोलीस ठाणे हद्दीत तासवडे टोलनाक्याजवळ असणारे श्रावणी
हॉटेल समोर उभ्या असणाऱ्या एस. टी. बस मधील व्यक्तीस हाताने लाथा बुक्क्यांनी व तलवारीने जबर
मारहाण करुन धाडसी दरोडा टाकून सुमारे ९२ तोळे सोन्याचे दागिणे व ३२,५००/- रुपये रोख रक्कम
लुटणाऱ्या टोळीस ताब्यात घेवून ७१,९४, २५०/- रुपये किमतीचे ९२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व गुन्हा
करण्याकरीता वापरलेली ५,००,०००/- रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा ७६,९४,२५०/- रुपये
किमतीचा मुद्देमाल जप्त.)
दिनांक ३०/०७/२०२५ रोजी पहाटे ००.१० वा. चे सुमारास वराडे ता. कराड जि. सातारा गावचे हद्दीत श्रावणी
हॉटेल समोर प्रवाशांना नैसर्गिक विधी करण्याकरीता थांबलेल्या एस. टी. बस क्रमांक MH14 KQ 9156 मध्ये तीन
इसमांनी प्रवेश करुन सिट नंबर १२ वर बसलेल्या कृष्णा कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास जबर मारहाण करुन त्याचे
कब्जातील ९२ तोळे सोन्याचे दागिणे व ३२,५००/- रुपये रोख रक्कम असलेली बॅग जबरीने चोरी करुन घेवून गेले
बाबत तळबीड पोलीस ठाणे गु.र.नं. १०७/२०२५ भा. न्या. सं.क. ३०९ (६), ३०५ (क), ३(५) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य व पार्श्वभुमी पाहता एस. टी. बस मध्ये प्रवास करणारे कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास
प्रवासा दरम्यान एस.टी. बस थांबल्यानंतर जबर मारहाण करुन त्यांच्या कब्जातील सुमारे ९२ तोळे वजनाचे सोन्याचे
दागिणे व ३२,५००/- रुपये रोख रक्कम चोरी केली होती ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याने गुन्हयाची
त्वरील उकल होण्याकरीता सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथे वर्ग केला. पोलीस निरीक्षक अरुण
देवकर यांनी नमुद गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांचेकडे देवून त्यांना गुन्हा तात्काळ
उघडकीस आणून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यातच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक
परितोष दातीर, पो.हवा. हसन तडवी, पो.हवा. मनोज जाधव, पो.हवा. प्रविण कांबळे, पो.कॉ. प्रविण
पवार या तपास पथकाने आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन १) राहुल दिनेश शिंगाडे रा. शिंगणापूर ता. माण
जि. सातारा व २) महावीर हनुमंत कोळपे रा. बिबी ता. फलटण जि. सातारा यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे
अनुशंगाने सखोल कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता असे निष्पन्न झाले की, आरोपी महावीर हणमंत कोळपे हा
कृष्णा कुरिअर कोल्हापूर येथे नोकरीस होता, त्यामुळे त्याला कुरिअर कंपनीचा कर्मचारी कधी कधी सोन्याचे
दागिणे घेवून जातो हे माहित होते. त्यानंतर नमुद आरोपींनी त्या कर्मचाऱ्याकडून चोरी करण्याचा प्लॅन केला व त्या
मार्गाची रेकी केली. त्यानंतर १) राहुल दिनेश शिंगाडे रा. शिंगणापूर ता.माण जि. सातारा, २) महावीर हणमंत
कोळपे रा. बिबी ता. फलटण जि. सातारा, ३) अभिजीत महादेव करे रा. रावडी ता. फलटण जि. सातारा, ४) अतुल
महादेव काळे रा.भांब ता. माळशिरस जि.सोलापूर व २ फरारी आरोपी असे सर्वजण दिनांक २९/०७/२०२५ रोजी
इनोव्हा क्रार क्रमांक MH12 UM 4723 व स्विफ्ट डिझायर क्रमांक MH12 SF 1416 मधून कोल्हापूर येथे गेले
होते. कोल्हापूर बसस्थानकावर सर्वजण थांबून रात्री साधारण ९.३० वा. चे सुमारास कृष्णा कुरिअर कंपनीचा
कर्मचारी बॅग घेवून कोल्हापूर ते मुंबई जाणारे बस मध्ये बसल्यानंतर ठरल्याप्रमाणे एक फरारी आरोपी
एस.टी. बसमध्ये बसला, त्यानंतर इतर सर्वजण इनोव्हा व स्विफ्ट डिझायर कारमधून एस. टी. चा पाठलाग करीत होते.
सदरची एस. टी. बस श्रावणी हॉटेल समोर थांबल्यानंतर बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले, त्यावेळी फरारी
आरोपीने इतर आरोपींना इशारा केला व राहुल दिनेश शिंगाडे अतुल महादेव काळे असे एस. टी. बसमध्ये गेले व
तिघांनी त्या कर्मचाऱ्यास हाताने लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी तलवारीने मारहाण करुन त्याचेजवळ सोने
"
असलेली बॅग चोरी करुन पळून गेले होते. गुन्हयाचे तपासामध्ये गुन्हा ६ आरोपींनी केला असल्याचे तपासामध्ये
निष्पन्न झाल्याने नमुद गुन्हयास भा. न्या. सं . क.३१० (२), ३११, ६१ (२), ३(५) अशी कलम वाढ करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे अधिपत्याखाली तपास पथकाने नमुद गुन्हयातील उर्वरीत आरोपींच्या
ठावठिकाण्याबाबत तांत्रिक विश्लेषन, गोपनिय बातमीदार तसेच पारंपारीक तपास कौशल्याचा वापर करुन आरोपी
अतुल महादेव काळे व अभिजीत मनोहर करे हे खुटबाव ता.माण जि.सातारा पासून भांब ता. माळशिरस
जि. सोलापूर परिसरात असणारे घनदाट भालधोंडीच्या जंगलामध्ये लपून बसले असल्याची माहिती प्राप्त केली.
तपास पथक सलग अहोरात्र ७ दिवस भालधोंडीच्या जंगलामध्ये पायी चालत नमुद आरोपींचा शोध घेत होतो.
परंतू आरोपी जंगलामध्ये कोठे लपून बसले आहेत हे समजून येत नव्हते. त्याकरीता आरोपींचा शोध घेण्यासाठी
पथकाने ड्रोनचा वापर केला. दि. २४/०८/२०२५ रोजी आरोपी कोठे लपून बसले आहेत हे ड्रोनच्या माध्यमातून
शोधले, पोलीस पथक हे आरोपींचा अवकाशातून तसेच जंगलातून जमिनीवरुन देखील शोध घेत होते. त्यानंतर
दि.२५/०८/२०२५ रोजी पुन्हा ड्रोनचा वापर केला तपास पथक जंगलातून पायी चालत ड्रोनच्या सहाय्याने आरोपी
लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचले. तपास पथक आरोपींजवळ पोहोचल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न
केला परंतू पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी अतुल महादेव काळे व अभिजीत मनोहर करे
यांना गुन्हयाचे कामी पाठलाग करुन ताब्यात घेवून अटक केली. नमुद आरोपींची ३ दिवस पोलीस कोठडी
घेवून पोलीस कोठडी मुदतीत त्यांचेकडे सखोल व कौशल्यपुर्वक तपास करुन आरोपी अतुल
महादेव काळे याने लपवून ठेवलेले ७१,९४,२५०/- रुपये किमतीचे ९२ तोळे सोन्याचे दागिणे व
बिस्कीटे हस्तगत केली. दि.२८/०८/२०२५ रोजी नमुद आरोपींची पुन्हा ५ दिवस पोलीस कोठडी
वाढवून घेतली त्या दरम्यान आरोपी अभिजीत मनोहर करे याचेकडून गुन्हयात वापरलेली स्विफ्ट
डिझायर क्रमांक MH12 SF 1416 हस्तगत करून एकूण ७६,९४,२५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल
हस्तगत केला असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर हे करीत
आहेत.
श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस
उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, मनोज जाधव, हसन तडवी, प्रविण
कांबळे, अजय जाधव, अमित झेंडे, प्रविण पवार, संकेत निकम, अमृत कर्पे, विजय निकम, दलजीत जगदाळे,
आनंदा भोये यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी पोलीस
अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments