सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत (सर)
साखरवाडी जायंटस् ग्रुपचा पदग्रहण समारंभ संपन्न.
जायंटस् वेल्फेअर फाउंडेशन ( फेडरेशन 2 C) अंतर्गत साखरवाडी जायंटस् ग्रुपचा पदग्रहण समारंभ नुकताच फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात संपन्न झाला. अध्यक्ष म्हणून श्री हरिदास सावंत सर , उपाध्यक्ष श्री तानाजी जगदाळे व शंकर धोत्रे , सचिव श्री महादेव लांडगे तसेच कार्यकारिणी सदस्य सर्वस्वी श्री श्यामराव भोसले , सचिन पवार , विकल्प माने , रोहिदास गावित , संग्राम पवार , हरिष गायकवाड , ओंकार सरगर , सुभाष बोंद्रे , प्रशांत रणवरे , संजय भोसले , सचिन भोसले , महेश वाणी , टीलू शहा , दिपक पंडित इत्यादींनी शपथ घेतली. याप्रसंगी फलटण जायंटस् चे पदाधिकारी माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , सहेली ग्रुपच्या माननीय श्रीमंत सौ शिवांजलीराजे नाईक निंबाळकर , चितळे दूध समूहाचे सदस्य आणि स्पेशल कमिटी मेंबर माननीय श्री गिरीश चितळे , जायंटस् केंद्रीय कमिटी मेंबर डॉक्टर अनिल माळी , प्रशांत माळी , राजकुमार ओसवाल , राकेश कोठारी , सुहास खोत, सुवर्णा माळी , मंदाकिनी साखरे , मोहनराव निंबाळकर , सचिन बेडके - सूर्यवंशी , पत्रकार रविंद्र बेडकिहाळ , ऍडव्होकेट विलासराव पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.गेली सुमारे ५० वर्षे जायंटस् ग्रुप फलटण साठी भरीव योगदान दिलेले माननीय श्री शांताराम आवटे सर आणि प्रभाकर भोसले सर यांच्या सहकार्याने साखरवाडी जायंटस् ग्रुप ची स्थापना झाली असून या माध्यमातून साखरवाडी परिसरात अनेक सामाजिक , सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून ग्रुपचा नावलौकीक सर्वदूर नेण्याचा मनोदय नूतन अध्यक्ष श्री हरिदास सावंत सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला.सर्वच मान्यवरांनी ग्रुपला शुभेच्छा देऊन भविष्यात उत्तम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment
0 Comments