सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागास ओपन टू ऑल प्रवेश पाचव्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती क्रम द्यावा - प्राचार्य डॉ .पी. एच्. कदम
सोमवार दि.4 ऑगस्ट 2025 इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2025 - 26 मध्ये शासनाने ऑनलाईन राबविली असून या प्रवेश प्रक्रिये च्या आत्तापर्यंत चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून पाचवी फेरी ओपन टू ऑल अशी असून अद्याप ज्या विद्यार्थ्यांना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला नाही. तसेच जे विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत त्या विद्यार्थ्यांना मुधोजी महाविद्यालय कनिष्ठ विभाग हा उत्तम पर्याय असल्याचे लक्षात येत आहे .महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांनी या फेरीत प्रथम पसंती क्रम द्यावा व आपला प्रवेश लवकरात लवकर 100% टक्के अनुदानित कॉलेजमध्ये निश्चित करावा असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी .एच् कदम सर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ भोसले यु .एस्. यांनी केले आहे व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी व सर्व स्तरावर मदत करण्यासाठी मुधोजी महाविद्यालय कनिष्ठ विभाग सज्ज असल्याचे सांगितले.

Post a Comment
0 Comments