Type Here to Get Search Results !

फळांचेगाव धुमाळवाडी येथे २० सप्टेंबर ला रानभाजी महोत्सवाचे आयोजन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फळांचेगाव धुमाळवाडी येथे २० सप्टेंबर ला रानभाजी महोत्सवाचे आयोजन.



 फलटण -रानभाज्यांचे आहारातील महत्व लक्षात घेता  मानवी आरोग्य चांगले आणि निरोगी  रहाण्यासाठी  रोजच्या आहारात भाज्या खूप महत्व वाढले आहे  आणि सर्वसामान्यांना त्यांची ओळख व्हावी व संवर्धनात सहभाग वाढावा या उद्देशाने दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद शाळा, फळांचे गाव धुमाळवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे 'रानभाजी ओळख व संवर्धन' या कार्यशाळेचे  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे-१६ (स्वायत्त),  महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ नागपूर व  कृषी विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.  सदर कार्यक्रमास आमदार, विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य मा. सचिन पाटील, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्यालय, पुणे, डॉ प्राची क्षीरसागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा भाग्यश्री पवार फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा अजय शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड,, मंडळ कृषी अधिकारी विडणी  शहाजी शिंदे,विभागीय सल्लागार महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे विभाग विलास बच्चे , उपसरपंच रुपाली विक्रम जाधव, उप कृषी अधिकारी अजित सोनवलकर, ,कृषी सेवा रत्न, सहाय्यक कृषी अधिकारी सासकल सचिन जाधव  व इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहे.  तरीही ज्यांना रानभाज्यांविषयी माहिती  जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी रानभाज्यांच्या नमुन्यासह उपस्थित राहावे. सदरकार्यशाळा सर्वांसाठी खुली आणि निशुल्क आहे.गावातील महिला बचत गट, ग्रामस्थ शेतकरी तसेच फलटण तालुक्यातील शेतकऱ्यानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याबाबत  आयोजका मार्फत अहवान करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments