सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मुधोजी महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.
दि. ५ सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला. या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर श्री कदम पी एच सर हे होते. प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य सौ भोसले यु एस., तर मार्गदर्शिका प्रा .सौ. देशमुख एन. डी. म्हणून उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता बारावी कला विभागाची विद्यार्थिनी कु. अंकिता भांडवलकर हिने केले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. कु. बनकर रितू ,कु .माधुरी जाधव,कु .मसुगडे पायल, कु.आकांक्षा सूर्यवंशी यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते कसेअसते. शिक्षक आपल्या शैक्षणिक जीवनातील प्रमुख व अत्यंत विश्वासाचा मार्गदर्शक असतो असे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपले मत व्यक्त केले. या मनोगतामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. यामध्ये कु. प्रज्ञा गायकवाड,चि. ओंकार फाळके,कु. प्रतीक्षा नाळे,कु. वैष्णवी काळोखे, सुजल अहिवळे ,प्रणिता राऊत या विद्यार्थ्यांनी उत्तम भाषण केले. तसेच प्राध्यापकांच्या वतीने श्री. निंबाळकर सर ,श्री. शिंदे सर ,देशमुख मॅडम व उपप्राचार्या सौ भोसले यु एस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. पी .एच. कदम सर यांनी कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचा कनिष्ठ विभागाचा सर्व प्राध्यापक नोंद उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंकिता भांडवल कर हिने उत्तम पद्धतीने केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी कु. माधुरी जाधव व कु.प्रतीक्षा नाळे यांनी देशभक्ती पर गाण्याने कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment
0 Comments