सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
साखरवाडी ता. फलटण याठिकाणी बनावट लॅब रिपोर्ट तयार करणारी टोळी कार्यरत, लॅब चालकासह चार जनांच्यावर गुन्हा दाखल.
दिनांक १०/०९/२०२५ रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे डॉ. ब्रम्हानंद
रामराव टाळे, वय ५२ वर्षे रा. बोबडे कॉलनी शंकरनगर खामगाव ता. खामगाव जि.
बुलढाणा यांनी दिलेल्या तक्रारीवर
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन
गु. रजि.नं.६४३/२०२५ भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०,४६५,४६८,४७१,३४
भारतीय वैदयकीय अधिनियम १९६१ चे कलम ३३ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर
गुन्हयाचे तपासामध्ये साखरवाडी ता. फलटण येथील धन्वंतरी लॅबोरेटरीचे चालक
विशाल नाळे रा. वाठार निंबाळकर ता.फलटण, डॉ. बाळासाहेब राऊत रा. साखरवाडी
ता.फलटण व इतर ०२ आरोपी यांनी धन्वंतरी लॅबोरेटरी सांखरवाडी ता. फलटण या
लॅबोरेटरी मध्ये स्रणाचे रक्त व मुत्र इत्यादी नमुन्यावर चाचणी अहवाल तयार करणे व
तो प्रमाणित करणे यासाठी विधीग्राह्य आर्हताप्राप्त व्यक्ती, पॅथोलॉजी विषयात पदव्युत्तर
शिक्षण घेतलेल्या नोंदणीकृत वैद्यक व्यावसायीक नसताना हा अवैध वैद्यक व्यवसाय
सुरु आहे. उपरोक्त कायद्यातून पळवाट काढण्याच्या हेतूने डॉ.टाळे यांचे सहीचा
दुरुपयोग करून पेशंटला बनावट रिपोर्ट दिले जात आहेत. सदर रिपोर्ट पॅथोलॉजीस्ट
नी प्रमाणित केले आहेत असे भासवून त्रणाची, डॉक्टरांची व insurance कंपनीची
फसवणूक केली जात आहे. तरी सदर गुन्हयाचे तपासाचे अनुंशगाने लॅबचालक विशाल
एम नाळे यास अटक करण्यात आली असून उर्वरीत आरोपी यास अटक करण्याची
तजवीज ठेवली आहे.
मा. पोलीस अधिक्षक श्री तुषार दोषी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली
कडूकर,उपविभागीय पोलीस अधिकारी तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
सुनिल महाडीक, पोलीस उपनिरीक्षक श्री. दिपक पवार, पो. हवा महादेव पिसे, अमोल
रंगवाड यांनी तपासामध्ये सहभाग
पवार, पो. कॉ. अमोल देशमुख, गणेश ठोंबरे, मारूती
घेतला आहे.सदूर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments