Type Here to Get Search Results !

मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने "हिंदी दिन" साजरा.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने "हिंदी दिन" साजरा.


फलटण .दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला ,वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकडून "हिंदी दिन" उत्साहाने साजरा करण्यात आला. दिनांक 14 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारत देशामध्ये" हिंदी दिन "साजरा केला जातो .या दिनाच्या निमित्ताने मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने हिंदी दिन साजरा केला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी .एच. कदम सर उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मुधोजी महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या हिंदी विषयाच्या प्राध्यापिका डॉ. श्रीमती सविता नाईक निंबाळकर .यादेखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु. रितू बनकर हिने केले. तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक प्रा श्री .शिंदे डी .एल. यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व सत्कार कला , वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी केले. यानंतर इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हिंदी दिनाबद्दल आपली मनोगते व्यक्त केली. व आपल्या मनोगतांमध्ये हिंदी भाषेची माहिती दिली. यानंतर डॉ.श्रीमती सविता नाईक निंबाळकर यांनी हिंदी भाषेचा इतिहास, हिंदीच्या बोलीभाषा ,हिंदी वाड्मय, हिंदी साहित्य, साहित्याचे प्रकार,हिंदी साहित्यातील लेखक व त्यांचे योगदान भारतीय स्वातंत्र्यांमधील हिंदी भाषेचे योगदान, जागतिक स्तरावरील हिंदी चे महत्व , रोजगार उपलब्धी याबाबत सखोल माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली. माननीय अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच. कदम. सर यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून हिंदी भाषेची   गरज व महत्त्व समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या प्रसंगी मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचा सर्व प्राध्यापक , सेवक वृंद तसेच तिन्ही शाखांमधील विद्यार्थी वर्ग उत्साहाने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी कु.जाधव हिने सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments