सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घेण्याची संधी.
दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय यांनी काढलेल्या पत्राद्वारे अद्याप कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते 25 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश मिळणार असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. अद्याप प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभागातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेला प्रवेश घेता येऊ शकतो. तरी संदर्भीय पत्रानुसार अद्याप जे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकलेले नाहीत त्यांनी दिनांक 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार ते दिनांक 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार पर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व शाळांशी संपर्क करावा, व सर्व कागदपत्रा सहित वेळेत उपस्थित राहून, दिलेल्या मुदतीतच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे. फलटण तालुक्यामध्ये मुधोजी महाविद्यालय कनिष्ठ विभाग, श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय, सरदार वल्लभभाई हायस्कूल व जुनियर कॉलेज साखरवाडी अशा मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क करावा.

Post a Comment
0 Comments