सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत (सर)
साखरवाडी येथे उद्यापासून सुरु होणाऱ्या शारदोत्सव - २०२५ निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.
यावर्षीचा श्री शारदोत्सव, सोमवार दि. 22 /०९/२०२५ ते गुरुवार दिनांक ०२/१०/२०२५ अखेर साजरा होत असून या निमित्ताने साखरवाडी (ता फलटण) येथील श्री नवरात्र शारदोत्सव मंडळाच्या भवानी माता मंदिरात विविध धार्मिक-सामाजिक-राष्ट्रीय उपक्रमांबरोबरच प्रामुख्याने
महिला व शालेय मुला-मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेआहे.मंडळाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मंडळ यावर्षी आपला ४१ वा श्री शारदोत्सव साजरा करत आहे. पारंपारिक पद्धतीने याही वर्षी भजन, किर्तन,
देवीच्या गाण्यांचे कार्यक्रम महासप्तशती होमहवन आयोजित केले असून खास महिला भगिनींसाठी भव्य रोख रकमेच्या निबंध स्पर्धा, पैठणीसाठीचा चला खेळू पैठणीसाठी हा खेळ, पाककला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. शालेय मुला-मुलींसाठी रांगोळी, चित्रकला व नृत्यस्पर्धांचे आयोजन
करण्यात आले आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. 'याबरोबरच रक्तदान शिबिर, मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, सर्वरोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.शारदोत्सव मंडळाने साखरवाडी बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी स्वखर्चाने उभारलेल्या प्रशस्त अशा श्री भवानीमाता मंदिरात मंडळ आपला ४१ वा शारदोत्सव अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात .साजरा करणार असून मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय शिवराम भोसले यांचे
मार्गदर्शनाखाली सर्व सभासद उत्सव यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहेत.
उत्सवकाळात होणाच्या सर्व कार्यक्रम व स्पर्धाच्या
माहितीसाठी कार्यवाह श्री. हरिदास सावंत सर (९६८९८६८२३३) यांचेशी
संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments