सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
उमेदने दिली जगण्याची नवी उमेद..
*एक हात मदतीचा* सोलापूर जिल्ह्यात काही दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे माढा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे.अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान अशा संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद)माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबांना मदत पोहोचवण्याच्या हेतूने तालुक्यातील स्टाफ , केडर व महिला समूहाच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून *जीवनावश्यक वस्तू, पीठ, तांदूळ,भाजीपाला लहान मुलांचे कपडे,ब्लांकेट, लहान मुलांची औषधे, सॅनिटरि पॅड, लहान मुलांसाठी बेबी फूड,कपडे* इत्यादी एकत्र करून पूरग्रस्त भागातील स्वयंसहायता समूहामधील कुटुंब पर्यंत पोहोचवण्यात आला. त्यांना पुन्हा एकदा नव्या सुरुवातीसाठी मनोबल वाढवण्याचा प्रयत्न उमेद -तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष माढा टीमच्या माध्यमातून करण्यात आला.
आपल्या जवळची माणसं,पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेले पीक, जनावरे डोळ्यासमोरं वाहत जातात तेव्हा त्यांच्या मनाला होणारी वेदनाची जाणीव प्रत्त्येकाच्या चेहरेवर दिसत होती. या कठीण काळामध्ये आपल्याला एकमेकांना धीर द्यावा, संकटे तात्पुरते आहे पुन्हा आपल्याला नव्या उमेदीने उभं राहून भरारी घ्यायची आहे असा मानसिक आधार देऊन त्यांचा संसार नव्याने सुरू करण्याचा व मानसिक बळ देण्याचा प्रयत्न उमेदच्या माध्यमातून देण्यात करण्यात आला.यावेळी कुर्डू प्रभाग व उपळाई प्रभाग, भोसरे प्रभाग मधील स्वयंसहायता समूहांनी विविध प्रकारचे जीवनावश्यक वस्तू व साधनसामुग्री एकत्रित करून पूरग्रस्त भागापर्यंत पोहोचवण्यासाठी कुर्डू, उपळाई व भोसरे मधील महिलांनी व प्रेरिका यांनी मदत केली. यामध्ये दारफळ निमगाव( मा), उंदरगाव, केवड , म्हैसगाव या गावांपर्यंत ही मदत पोहोचवण्यात आली आहे. जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे सर यांच्या माध्यमातून महिलांना ब्लॅंकेट वितरित करण्यातआले.शुभदा समूहाच्या अध्यक्ष स्वाती पाटील यांच्या माध्यमातून चादर व लहान मुलांच्या गादी देण्यात आले.कुर्डूवाडी येथील बालरोग तज्ञ डॉ.परम बिनायकिया यांनी लहान मुलांसाठी औषध पुरवठा बाबत सहकार्य लाभले. कुर्डूवाडी येथील कापड दुकानदार रामचंद्र भगवान यांनी लहान मुलांचे कपडे व इत्तर साहित्य पुरवले. मा गट विकास अधिकारी महेश सुळे सर यांच्या मार्गदर्शनात तालुका टीम अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन अवधूत देशमुख, तालुका व्यवस्थापक अभिजीत पांढरे,प्रभाग समन्वयक नीता काळे,कृष्णा लोंढे, प्रमोद हगवणे,निहाल बागवान, सुदर्शन यादव,योगेश सातपुते यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन समूहातील महिलांना साहित्य वाटप केले.कुर्डू प्रभागमधून कोमल अवताडे, पूजा अनंतकवळस प्रतिभा अजित वर्पे,वैशाली भीमराव वर्पे,सुप्रिया बाळू लोंढे,रूपाली भास्कर ढाणे,पूजा आवारे,संगीता भोसले, शोभा भोसले, रेश्मा उबाळे,शुभांगी बागल यांनी सर्व किट बनवणे बाबत सहकार्य करून वाटप केले.



Post a Comment
0 Comments