सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
श्रीराम सहकारी साखर कारखान्याची आज ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणच्या अधीमंडळाची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.२९ रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर.
फलटण दि. २५ : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणच्या अधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत असून सर्व सभासदांनी या वार्षिक सभेस वेळेवर उपस्थित राहून कामकाजात भाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा संचालक मंडळाकडून आलेला अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे, सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील हिशोबाचे ताळेबंद व नफा तोटा पत्रके दाखल करून घेणे व स्वीकारणे, चार्टर्ड अकाउंटंट यांचे कडून आलेल्या सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल दाखल करुन घेणे व स्वीकारणे, सन २०२६ -२७ या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाची तसेच निधी उभारणी करता सुचविलेल्या उपाययोजनांची नोंद घेणे आणि सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्चाची नोंद घेऊन मंजुरी देणे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी-यळगुड ऑपरेटर ऑफ श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण यांनी सन २०२४ -२५ मध्ये केलेल्या भांडवली गुंतवणुकीची नोंद घेऊन मान्यता देणे बाबत असे एकूण ९ विषय या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर घेण्यात आले आहेत.
सर्व सभासदांनी या वार्षिक सभेस उपस्थित राहून विषय पत्रिकेवरील सर्व विषयांच्या चर्चेत सहभागी होऊन आपले मत नोंदवावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments