सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
साखरवाडी शिक्षण संस्थेच्या संचालक पदी- धनंजय साळुंखे -पाटील,माणिक(आप्पा) भोसले, राजेंद्र शेवाळे यांची बिनविरोध निवड.
साखरवाडी शिक्षण संस्थेची 62 वी वार्षिक सर्व साधारण सभा साखरवाडी विद्यालय तांत्रिक विभागाच्या कार्यशाळेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
पारंभी या संस्थेच्या सचिव सौ. उर्मिला जगदाळे यानी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करुन सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष धनंजय प्रल्हादराव साळुंखे यांनी स्विकारावे अशी सूचना मांडली यानंतर या वर्षात मयत सभासद व मान्यवर यांचे निधन झाले त्याना श्रध्दांजली वाहून विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
या सभेत तीन प्रवर्गातील संचालकाची तीन वर्षाची मुदत संपल्याने त्यांची फेर निवड या मध्ये धनंजय प्र. साळुंखे व राजेंद्र यशवंत शेवाळे यांची फेरनिवड एकमताने झाली. यानंतर आश्रयदाते या प्रवर्गातून कौशल राजेंद्र भोसले यांचे विरुध्द माणिक शिवराम भोसले यानी उमेदवारी जाहीर केल्याने त्यांचे मतदान घेवून माणिक शिवराम भोसले यांची संस्थेच्या संचालकपदी नवीन नियुक्ती करण्यात आली. यावेळी या तीन उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. सदरची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेस संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष व जेष्ठ नेते श्री.प्रल्हादराव पाटील व जेष्ठ सभासद हिरालाल पवार , पाडुरंग भोसले ,सुरेश पवार व संस्थेचे सर्व सभासद यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment
0 Comments