सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
श्रीराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
फलटण : दि. २९ सप्टेंबर २०२५ फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. ची ७० वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज उत्साहपूर्ण वातावरणात, सर्व ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या सभेस महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
तसेच माजी आमदार मा. श्री. दिपकराव चव्हाण सर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. श्री. बाळासाहेब शेंडे यांसह सर्व संचालक मंडळाचे सदस्य व मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment
0 Comments