Type Here to Get Search Results !

मुधोजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

 मुधोजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा.



दिनांक 24 सप्टेंबर  रोजी "राष्ट्रीय सेवा योजना " स्थापना दिवस भारतातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दिनांक 22 सप्टेंबर ते दिनांक 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुधोजी महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विभागात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती, विद्यार्थी प्रिय शिक्षकांचा सत्कार, शहीद भगतसिंग यांची जयंती, हृदयरोग व आरोग्य या विषयी व्याख्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को मध्ये झालेला समावेश याबद्दल मार्गदर्शन व व्याख्यान, प्लास्टिक मुक्त परिसर, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.कदम सर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. भोसले यु. एस. राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर चे कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री .नाईक निंबाळकर एस. एल., सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ जाधव एस .एस. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सर्व कार्यक्रमांचे आयोजन करून हा सप्ताह उत्साही पणे पार पाडला. व स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचावा यासाठी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments