सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/दादा जाधव
९ सर्कल येथे जय हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमा अंतर्गत महाआरती संपन्न ..
९ सर्कल ता.फलटण जि.सातारा येथे जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमा अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते
ही महाआरती मा. ॲड.सौ.जिजामाला रणजीत सिंह नाईक निंबाळकर माजी सदस्य जिल्हा परिषद सातारा,मा. सौ.शरयू जितेंद्र साळुंखे पाटील सरपंच ग्रामपंचायत सुरवडी,मा. सौ. हेमा विक्रमसिंह भोसले सदस्या ग्रामपंचायत साखरवाडी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली
या मंडळाची स्थापना शिंदे गुरुजी, सुनिल बनकर, आप्पा यादव, यांच्या पुढाकाराने सन १९९५ साली महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ यांच्या वसाहती च्या आवारात झाली तेव्हापासून गेल्या ३० वर्षांपासून ही परंपरा नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात, उत्साहात, आणि आनंदात सुरू आहे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेऊन सर्व कार्यक्रम आयोजित करून पार पाडत असतात
हा कार्यक्रम श्री. सचिन मदने व श्री. वैभव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला असून
यावेळी जय हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष अक्षय नलवडे,उपअध्यक्ष सागर कारंडे,खजिनदार श्री. निखिल ढेकळे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments