सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
पवार गल्ली नवरात्र महिला उत्सव मंडळाने आयोजीत केलेल्या"होम मिनिस्टर" कार्यक्रमास नारी शक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
महाराजा प्रतिष्ठान संचलित पवार गल्ली नवरात्र महिला उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात पैठणीच्या मानकरी पुष्पा साळुंखे तर नवदुर्गा मानाच्या पैठणच्या मानकरी जेष्ठनागरिक श्रीमती लीलाबाई पवार ठरल्या.
पवार गल्ली नवरात्र उत्सव मंडळाचे यंदाचे तिसरे वर्ष असून गेली नऊ दिवस दांडिया, दांडिया गरबा, विविध नृत्य स्पर्धा, माहेरवाशीनेच्या ओटी भरण कार्यक्रम, कन्या पूजन असे विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले होते. सोमवार दिनांक 29 रोजी शेखर ओहोळ प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
यावेळी प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी पुष्पा साळुंखे तर लकी ड्रॉ नवदुर्गा मानाच्या पैठणच्या मानकरी श्रीमती लीलाबाई पवार, द्वितीय क्रमांकच्या सोन्याच्या नथीच्या मानकरी शुभदा पवार, वैशाली शितोळे, तृतीय क्रमांकच्या चांदीचा छल्लाच्या मानकरी प्रगती बनकर, फार्मिंग ठुशी मानकरी नीता चांगन, स्मार्टवॉच मानकरी दिशा शेलार या विजेत्या ठरल्या. यावेळी 30 आकर्षक बक्षीसांचा लकी ड्रॉ काढण्यात आला.
यावेळी होम मिनिस्टरचे आयोजक सचिनशेठ गाणबोटेहोते तसेच ए व्ही ज्वेलर्स फलटण, चंदूकाका सराफ अँड सन्स हे बक्षिसाचे प्रायोजक होते. असंभव ग्रुप च्या वतीने स्मार्ट वॉच देण्यात आले.
लकी ड्रॉ ची बक्षीसे पंचम हिंदकेसरी सर्जा बैलाचे मालक अभिजीत भैयापवार सौ. दीपाली पवार व सचिनशेठ गानबोटे, सौ.पल्लवी गानबोटे यांच्या वतीने देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पवार
गल्लीतील नवरात्र उत्सव मंडळातील सर्व महिलांनी कष्ट घेतले.

Post a Comment
0 Comments