Type Here to Get Search Results !

मुहम्मद पैगंबर जयंती व शिक्षक दिनाचे औचित्य साधून साखरवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ हरिदास सावंत (सर) 

 मुहम्मद पैगंबर जयंती व शिक्षक दिनाचे औचित्य साधून साखरवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


  मुहम्मद पैगंबर जयंती आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती ( शिक्षकदिन ) निमित्ताने साखरवाडी मुस्लिम जमात बांधवांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन....वृध्दाश्रम बांधकामाचे भूमिपूजन::::: मुहम्मद पैगंबर जयंती आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती म्हणजेच शिक्षकदिनाच्या निमित्ताने साखरवाडी येथे मुस्लिम बांधवांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.प्रामुख्याने पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते हजरत फारुकभाई शाह कादरी चीस्ती बंदानवाज यांनी आपली आई सौ शमीम इकबाल अत्तार ( साखरवाडी येथील स्वर्गीय गुलाबभाई मणेर यांच्या सुकन्या ) यांचे इच्छेनुसार साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग , प्राथमिक विभाग , बालक मंदिर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळेतील सर्व मुलांना पौष्टिक खाऊ वाटप आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना साड्या , शाल , श्रीफळ , पुष्प प्रदान करून कृतज्ञता व्यक्त केली. साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.प्रारंभी  उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे साखरवाडी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमाचे बांधकाम भूमिपूजन करण्यात आले.या उपक्रमासाठी आपली प्रशस्त जागा हजरत मंगाभाई शेख , सौदभाई शेख आणि परिवाराने दान केली आहे.हजरत फारुकभाई यांचे प्रेरणास्थान त्यांचे मोठे बंधू हजरत इर्शाद भाई अत्तार यांच्या संकल्पनेतून हे प्रशस्त असे " सांज येते घरा " नामक वृध्दाश्रम लवकरच गरजू वृध्द लोकांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. हे सगळे कार्यक्रम साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद रावजी साळुंखे पाटील, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री शंकररावजी माडकर , साखरवाडी पोलिस औट पोस्ट चे पी.एस.आय. माननीय श्री दिपक रावजी पवार , साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री विक्रमसिंह भोसले , श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन माननीय श्री नितीनजी भोसले , महानंद दूध शिखर संस्था मुंबईचे माजी व्हॉईस चेअरमन माननीय श्री डी.के.पवार ,  साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक माननीय  श्री राजेन्द्र शेवाळे व माननीय श्री कौशल भोसले , साखरवाडी मधील सामाजिक कार्यकर्ते श्री हरिदास सावंत सर , हजरत फारुक भाईंचे वडील श्री इकबाल अत्तार  व बंधू डॉक्टर मुहम्मद अझहरुद्दीन अत्तार, प्रगतशील बागायतदार श्री दिलूकाका भोसले , श्यामराव विठ्ठल भोसले , तानाजी जगदाळे , हाजी गुलमहंमद मदार शेख , हाजी मंगाभाई मदार शेख , हाजी फिरोझ शेख , श्री शौकतभाई कच्छी ,अजीम मणेर ,चिमणराव भोसले ,   हाजी इम्रान शेख , कौस्तुभ भोसले , श्री चंद्रकांत शहा तसेच साखरवाडी शिक्षण संस्थेतील सौ ऊर्मिलाताई जगदाळे , श्री संदीप चांगण , सौ विद्या चांदगुडे तसेच साखरवाडी परिसरातील सर्व मुस्लिम बंधू भगिनी, सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक शेती उद्योग व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन हजरत फारुक भाईंचे मार्गदर्शनाखाली श्री हरिदास सावंत सर , सौदभाई अब्दुल शेख , जुबेरभाई पठाण, शकीलभाई नजीर शेख, श्री नरेंद्र वाघ,श्री कौशल भोसले, माननीय श्री सचिन गणपत भोसले, अक्षय रुपणवर इत्यादींनी केले.सर्व मुस्लिम बांधवांनी उत्तम सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments