Type Here to Get Search Results !

फलटण ग्रामीण पोलीसांनी गहाळ/हरविलेले एकुण ७४ मोबाईल शोधून मुळ मालकांना केले परत.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फलटण ग्रामीण पोलीसांनी गहाळ/हरविलेले एकुण ७४ मोबाईल शोधून मुळ मालकांना केले परत.


फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधील सन २०२५ मध्ये १२,७०,०००/-किंमतीचे गहाळ झालेले /हरविलेले एकुन ७४ मोबाईल हस्तगत करून मुळ मालकांना परत देण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश .

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील गहाळ दाखल मोबाइल करण्यात आलेले होते

सदर मोबाईल हे परत देण्याकरीता ते सि. ई.आय. आर. पोर्टलच्या माध्यमातुन फलटण ग्रामीण

डी.बी.पथकास आदेशीत करण्यात आलेले होते. हरविलेले मोबाइल हे सि.ई. आय. आर. पोर्टल व

इतर तांत्रीक माहीतीचे चे माध्यमातुन शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना सदर मोबाइल हे

राज्यातील इतर जिल्हयात तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातुन वापरकर्त्याकडे

वारंवार फोन करून चिकाटीने ते कुरीयरने व इतर मार्गाने ते परत मिळविण्यात यश आले. काही

मोबाइल हे माऊली चे पालखी मेळाव्यात हरविलेले होते त्यातील जे मिळाले आहेत ते त्यांना कुरीयर

ने पाठविले आहेत. हरविलेले मोबाइल मिळाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. सदरची मोहीम

ही अशीच पुढे चालु राहणार असल्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे कार्यक्षम प्रभारी अधीकारी श्री

सुनिल महाडीक यांनी सांगीतले. जानेवारी २०२५ पासुन ते ऑगस्ट २०२५ पर्यंत १२,७०,०००/- रु

किमतीचे एकुन ७४ मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यातील माहे जुन ते ऑगस्ट महीण्याचे

दरम्याण एकुन ३९ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी मा. तुषार दोशी सो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सो, अपर

पोलीस अधीक्षक, पोलीस उप-अधीक्षक विशाल खांबे सो यांच्या सूचनांनुसार सुनिल

महाडीक, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे , पो.उपनि जी.बी, बदने,

पो.हवा. नितिन चतुरे, श्रीनाथ कदम (तात्या), अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी या केलेली आहे.

Post a Comment

0 Comments