सह्याद्री निर्भिड न्यूज
खामगाव/ दादा जाधव
खामगाव येथे उमाजी नाईक यांच्या जयंती उत्साहात साजरी.
खामगाव ता.फलटण येथे ७ सप्टेंबर
रोजी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंती निमित्त खामगाव मधील काळुबाई चौक येथे राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले खामगाव चे माजी उपसरपंच बाळासाहेब कुचेकर, साखरवाडी चे माजी सरपंच माणिक आप्पा भोसले, महानंदाचे अध्यक्ष डी.के.पवार, खामगाव ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पवार सर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली
यावेळी राजे उमाजी नाईक तरुण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण खोमणे, खामगाव ग्रामपंचायत सदस्य गणपत बोडरे, अशोक चव्हाण,पै.हनुमंत चव्हाण,तानाजी खोमणे, नागेश चव्हाण,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, सचिन बोडरे,अक्षय मदने, महेश शितोळे,सोनु बनसोडे, तेजस जाडकर,रोहित यादव, निलेश सोनवणे,सुशांत चव्हाण व समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment
0 Comments