Type Here to Get Search Results !

मुधोजी महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरा.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

"मुधोजी महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरा.


सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी"मुधोजी महाविद्यालयातील 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन. सी .सी .कोल्हापूर विभागाच्या वतीने 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आणि एन सी सी कडेट्स चा पिपिंग सेरेमनी मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पी एच कदम प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष स्थानी उपस्थित होते.तर ज्युनिअर विभागाच्या उप प्राचार्या सौ. भोसले मॅडम याही उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली.त्यानंतर एन सी सी कॅडेटस च्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गर्ल्स एन सी सी विभाग प्रमुख ANO लेफ्टनंट शिंदे मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून पीपिंग सेरेमनी साजरा करण्या मागचा उद्देश सांगितला .आणि त्यानंतर प्रमुख अथितींच्या शुभ हस्ते एन सी सी गर्ल्स कॅडेट यांना rank प्रदान करण्यात आल्या. त्यानंतर rank होल्डर कॅडेटसने आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर Dr. पी.एच. कदम यांनी गर्ल्स एन सी.सी कॅडेट्सना आंतर राष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यामागे काय उद्देश असतो हे सांगून एक एन सी सी कॅडेट म्हणून  तुम्ही समाजातील जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पाडू शकता याचे अनमोल असे मागदर्शन केले.त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कॅडेट  पायल जाधव हिने मानले.तर सूत्र संचालन कॅडेट तनया क्षीरसागर हिने केले. एन सी सी गान ने कार्यक्रमाची सांगता झाली.आणि त्यानंतर  प्रमुख अतिथी समवेत  रँक होल्डर कॅडेट चा ग्रुप फोटो काढून  झाल्यानंतर गर्ल्स एन सी सी कॅडेट चे आंतर राष्ट्रीय साक्षरता दिवस जागरूकता पथ नाट्य आणि रॅली काढण्यात आली. अशा प्रकारे मुधोजी महाविद्यालयातील गर्ल्स एन सी सी युनिट ने मोठ्या उत्साहाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आणि पिपींग समारोह साजरा केला.

Post a Comment

0 Comments