सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण /वैभव जगताप
भुईंज पोलीसांच्याकडुन ११लाख रु. किंमतीच्या गुटख्यासह १८ लाख रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
( भुईंज पोलीस ठाणेची कारवाई )
(महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या ११,००,०००/- (११ लाख रुपये) किमतीच्या राज कोल्हापुरी
पान मसाला/गुटख्यासह १८,००,०००/- लाख रुपये किमतीचा मुददेमाल जप्त.)
दि.११/०९/२०२५ रोजी भुईंज पोलीस ठाणेचे सपोनि रमेश गर्जे, पोलीस अंमलदार शिवाजी
जाधव, गणेश कदम असे पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करीत असताना सपोनि रमेश गर्जे यांना गोपनीय
बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंध असलेला सुगंधित पान
मसाला/गुटखा याची एका अशोक लेलंड कंपनीच्या बडा दोस्त मॉडेलच्या टेम्पोमधुन सातारा- पुणे
महामार्गाने वाहतुक केली जात आहे, अशी माहिती मिळाल्याने सपोनि रमेश गर्जे यांनी लागलीच श्री.
तुषार दोशी, भा.पो.से. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक
सातारा तसेच श्री. सुनिल साळुंके, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई यांना सदरची माहिती सांगीतली.
त्यानंतर त्यांचे आदेशाप्रमाणे कारवाईकामी सपोनि रमेश गर्जे यांनी त्यांचे टिम सह पाचवड पुलाजवळ
नाकाबंदी लावली असता पहाटे ०२.४५ वा. चे सुमारास सातारा बाजुकडुन एक अशोक लेलंड कंपनीचा
बडा दोस्त मॉडेलचा टेंम्पो क्रमांक KA 25 AB 9628 हा येताना दिसल्याने त्यावरील चालकास टेंम्पो
रोडचे बाजुला घेण्यास सांगुण टॅम्पो मधील मालाबाबत खात्री केली असता त्यामध्ये सुगंधित पान
मसाला/गुटखा असल्याची खात्री झाल्याने पुढील कारवाई करणे कामी अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व
औषध प्रशासन विभाग, सातारा यांना माहिती देवुन सदर ठिकाणी येवुन पुढील कारवाई करण्याची
विनंती केल्यावर अन्न व औषध प्रशासन विभाग, सातारा येथील श्रीमती वंदना रुपनवर, अन्न सुरक्षा
अधिकारी, इम्रान हवालदार, अन्न सुरक्षा अधिकारी हे हजर झाले. त्यांनी पकडण्यात आलेल्या अवैद्य पान
मसाला / गुटख्याची पंचांसमक्ष खात्री करुन त्याचा सविस्तर पंचनामा केला असता सदर टेंम्पोमध्ये
११,००,०००/-(आकरा लाख रुपये) किमतीचा कोल्हापुरी पान मसाला / गुटखा आढळुन आल्याने सदरचा
मुददेमाल तसेच ७,००,००० ( सात लाख रुपये) किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा बडा दोस्त मॉडेलचा
टॅम्पो क्रमांक KA 25 AB 9628 असा एकुण १८,००,०००/- ( आठरा लाख रुपये) कितीचा मुददेमाल
पंचांसमक्ष जप्त केला असुन सदर टेम्पो चालक तसेच इतर १ अशा दोघांविरुध्द भुईंज पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी, भा.पो.से. पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती डॉ. वैशाली
कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. सुनिल साळुंखे, उप-विभागीय पोलीस अधिकारी वाई
यांचे मार्गदर्शना खाली भुईंज पोलीस ठाणेचे सपोनि रमेश गर्जे, पो.उ.नि. सुरज शिंदे, पो.उ.नि. पतंग
पाटील, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, गणेश कदम, नितीन जाधव, सुशांत धुमाळ, सोमनाथ
बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर माहिते यांनी केली असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व
अंमलदार यांचे मा.पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उप-विभागीय
पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments