सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
तरडगाव येथे अपघात करुन पळुन गेलेल्या वाहन व वाहन चालकासह लोणंद पोलिसांनी वेळापुर येथुन घेतले ताब्यात.
लोणंद पोलीस स्टेशनचे डी.बी. पथक यांची दमदार कारवाई
अपघात करुन पळुन गेलेले वाहन चालकासह वेळापुर येथुन घेतले ताब्यात
लोणंद पोलीस स्टेशन हददीत लोणंद ते फलटण रोडवर मौजे तरडगाव ता फलटण गावचे हद्दीत
उड्डाण पुलावर फलटण बाजुकडे जाणारे लेनवर दिनांक 07/09/2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजणेचे
सुमारास एका मोटार सायकल स्वारास एका अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाने हयगयीने वाहन
चालवून पाठीमागुन जोराची धडक देवून त्यात मोटार सायकलस्वार अपघातात जखमी होवुन मयत झाला
होता. त्याबाबत लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. 316/2025 BNS 281,106(1), 125 (a) (b) 324
(4)(5) मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (a)(b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील चारचाकी वाहन पळुन गेल्याने वाहनाचा व वाहन चालक आरोपीचा शोध
घेणेकामी मा. श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक
सातारा, श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी सपोनि सुशिल भोसले यांना शोध
घेण्याकरीता मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे प्रभारी अधिकारी सपोनि सुशिल भोसले यांचे
मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने लोणंद, निरा, तरडगाव, फलटण तसेच इतर गाडीचा मागोवा काढीत अनेक
ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्हयातील वाहनाचा शोध घेवून ते महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ एन है
असल्याचे व त्यांचा नंबर एच.एम.45 ए.झेड. 4447 असा असल्याचे निष्पन्न केले तसेच त्यावरील चालक
यांचा तांत्रीक माहितीचे मदतीने शोध घेतला असता चालक नामे यशराज जितेंद्र घाडगे वय 23 वर्षे
रा. नागठाणा वेळापुर ता. माळशिरस जि.सोलापुर असे असल्याचे समजल्यानंतर त्यास व वरील वाहन
वेळापुर येथून ताब्यात घेतले आहे. सदरचा गुन्हा त्याचेकडुन झाल्याची त्याने कबुली दिली आहे. पुढील
तपास सहा. पोलीस फौजदार दिलीप येळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर मॅडम अपर
पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली
लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोउनि रोहित हेगडे,
सहा.पो.उपनिरीक्षक विजय पिसाळ, पोलीस हवालदार बापुराव मदने, विठठल काळे, अंकुश कोळेकर,
अमोल जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सदर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे
या चांगल्या कामगीरीबाबत सर्व स्थरावरुन कौतुकाची थाप मिळत आहे.

Post a Comment
0 Comments