सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
कंपनीत कॉन्ट्रॅक्ट व कामगारांचे कारणावरुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना शिरवळ पोलिसांनी केले जेरबंद.
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे केसुर्डी ता. खंडाळा गावचे हद्दीत दिनांक ०९/१०/२०२५ रोजी सायंकाळी ५.१०
वाचे सुमारास मौजे केसुर्डी ता. खंडाळा गावचे हददीत सातारा ते पुणे जाणारे हायवे रोडचे सर्विस रोडला केसुर्डी
गावाकडे जाणारे रोडवर ब्रिजखाली डेटव्हायलर कंपनीचे एच. आर. हेड श्री. राजू गिरीशकुमार नायडू हे कंपनी
सुटल्यानंतर आपले हुन्दाई अल्काजर कार क्रमांक एम एच १२ एक्स एच ८८४० या कारने घरी जात असताना होन्डा
अॅक्टिव्हा स्कुटरवर तीन अनोळखी इसमांनी येवून कंपनीतील कॉन्ट्रक्टचे व कामगारांचे कारणावरुन गाडी थांबवून लोखंडी
कोयता, लोखंडी रॉड व अरमाड केबल हातात घेवून दहशत माजवून गाडीचे बोनेटवर चढुन त्यांच्या हातातील लोखंडी
कोयत्याने गाडीची पुढील बाजूची काच फोडून गाडीच्या बोनेट व साईडच्या काचेचे त्यावेळी एकत्र नुकसान केले. त्यानंतर
ते अनोळखी हल्लेखोर हातवारे करून गाडीतून बाहेर येण्यास सागुन. श्री राजू नायडू यांना शिवीगाळ करत होते. तसेच
लोखंडी रॉड पुढील फुटलेल्या काचेतून फिर्यादी यांचे दिशेने जोरात मारला. तो फिर्यादीचे डावे नाकपुडीला लागल्याने
रक्त येवू लागले. त्यानंतर हातातील कोयता लोखंडी रॉड व अरमाड केबल हातात नाचवत शिवीगाळ करत लोकांचे
आंगावर धावून जात होती. त्यांनतर तिथे बघ्यांची गर्दी वाढल्याने सदरचे इसम खंडाळा बाजुकडे सर्विस रोडने पळून गेले.
सातारा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, फलटण उपविभागीय
पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांनी घडलेल्या घटनेची गंभीरता लक्षात घेवून शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस
निरिक्षख पो. नि. यशवंत नलवडे यांना वेगाने तपास करणेस्तव आवश्यक सुचना दिल्या. त्यानंतर पोलीस ठाणेचे
अधिकारी व पोलीस अंमलदार यांची तपास पथके तयार केले. उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण श्री.
विशाल खाबे यांचेकडुन आवश्यक माहिती बातमीदारांकडुन प्राप्त होईल तशी रवाना झालेल्या पथकास देत होते.
सदर आरोपींचा शोध घेत असताना खंडाळा, केसुर्डी एमआयडीसी व बावडा परिसरात शोध घेत असताना
आरोपी प्रतिक विलास गायकवाड हा मिळून आला. त्यास ताब्यात घेवून गुन्हयात अटक करुन त्याचेकडे कसून चौकशी
केली असता. उर्वरीत दोन आरोपीतांची माहीती मिळाल्याने त्या आरोपीतांचा शोध घेणेकरिता शिंदेवाडी, सारोळा,
कापूरव्होळ या परिसरात शोध घेत असताना शिंदेवाडी एमआयडीसी परिसरात इतर आरोपी अनिकेत संपत शिंदे व
अनिकेत दयानंद संपकाळ हे सुद्धा मिळून आले. या गुन्ह्यात सदर नामे आरोपी १) प्रतिक विलास गायकवाड वय २७ वर्ष
रा. अजनुज ता. खंडाळा जि. सातारा २) अनिकेत संपत शिंदे वय २६ वर्ष रा. खडकी ता. भोर जि. पुणे ३) अनिकेत
दयानंद संकपाळ वय २६ वर्ष रा. केंजळ ता. भोर जि. पुणे यांना मा. न्यायालयात हजर करुन त्यांना ता. १४/१०/२०२५
रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर कालावधीत आरोपीतांकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे लोखंडी
कोयता, लोखंडी रॉड व अरमाड केबल व होन्डा अॅक्टिवा स्कुटर जप्त करण्यात आली असून अधिक तपास पुढे चालू
आहे. तसेच खंडाळा व शिरवळ एमआयडीसी परिसरातील सर्व कंपनी प्रशासनास आवाहन करणेत येते की, आपल्या
कंपनीस कामगार कॉन्ट्रॅक्ट, भंगार कॉन्ट्रॅक्ट किंवा इतर कोणत्याही कारणास्तव धमकावण्याचे किंवा इतर प्रकारे त्रास
देण्याचे बेकायदेशीर प्रकार कोणी करित असल्यास त्याची माहीती पोलीस प्रशासणास देण्यात यावी, पोलीसांकडून
त्यांचेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरची कारवाई मा. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक
सातारा, श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस
निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के, पो.उपनि सतिश आंदेलवार, पोहवा सचिन वीर,
नितिन नलवडे, प्रशांत धुमाळ, तुषार कुंभार, सचिन फाळके, म.पो. हवा मनिषा बोडके, पो. कॉ. अरविंद बा-हाळे, भाऊसाहेब
दिघे, मंगेश मोझर, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अक्षय बगाड, दिपक पालेपवाड यांनी केलेली आहे. सदरच्या
उल्लेखनिय कामगीरीबाबत शिरवळ पोलीस ठाणेचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी,
पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक, श्री विशाल खांबे फलटण उपविभागीय पोलीस
अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments