सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
शेंद्रे येथील अल्युमिनीयम फॉन्ड्री कंपनी मधील ॲल्युमिनीयमच्या 69 विटा चोरणारी टोळी जेरबंद.
रेकॉर्डवरील संशयिताकडुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करुन 1,87,500/-रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
( स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई)
मौजे शेंद्रे ता.जि.सातारा येथील एका अल्युमिनीयम फॉन्ड्री कंपनी मधील ॲल्युमिनीयमच्या 69 विटा कोणीतरी
अज्ञात चोरटयाने चोरुन नेलेबाबतची तक्रार दि. 09/10/2025 रोजी सातारा तालुका पोलीस ठाणेस प्राप्त झाली. त्याबाबत
तक्रारदार यांचे तक्रारीवरुन सातारा तालुका पोलीस ठाणेस गु.र.नं. 372/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331 (4),
305(a) प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला होता.
श्री तुषार दोशी, पोलीस अधिक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक सातारा यांनी पोलीस
निरीक्षक श्री अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना व सातारा तालुका पोलीस ठाणेस नमुद गुन्हयातील
आरोपीबाबत माहीती प्राप्त करुन सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांचे अधिपत्याखाली पो.हे.कॉ. हसन तडवी, मनोज जाधव,
अमृत कर्पे, प्रविण कांबळे, अमित माने, शिवाजी भिसे, प्रविण पवार असे पथक तयार करुन त्यांना गुन्हा उघडकिस
आणणेकामी आदेश दिले. सदरचे तपास पथकाने व सातारा तालुका पोलीस ठाणेचे पथकाने घटनास्थळी भेट देवुन तेथील
तसेच आजुबाजुचे साक्षीदार यांचेकडे विचारपुस करुन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींबाबत माहीती प्राप्त
करणेचा प्रयत्न केला.
दि.10/10/2025 रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहीती प्राप्त
झाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील संशयित इसम विजय शंकर पवार रा. रामाचागोट, मंगळवारपेठ सातारा याने त्याचे
साथीदारांसमवेत केला आहे. प्राप्त झाले माहीतीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास पथकास नमुद
संशयित ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाने संशयिताचा शोध
घेवुन, त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार
यांचेसोबत मिळुन केला असल्याचे सांगितले. सदर माहीतीवरुन तपास पथकाने इतर संशयितांचा शोध घेत असतांना एक
साथीदार मिळुन आलेने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करुन सदर गुन्हयातील घरफोडीतील
चोरीस गेलेल्या अॅल्युमिनीयमच्या 69 विटा (वजन अंदाजे 500 किलो) व गुन्हयात वापरलेली मारुती 800 चारचाकी वाहन
असा एकुण 1,87,500/-रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा घरफोडीचा गुन्हा उघडकिस आणला आहे.
श्री तुषार दोशी, पोलीस अधिक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधिक्षक सातारा यांचे
मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर, सातारा तालुका पोस्टेचे पो. नि. श्री निलेश तांबे,
सपोनि सुदर्शन काटकर, स्था. गु.शा. चे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चालक स. फौ. नाना गुरव, पो.हे.कॉ. हसन तडवी,
मनोज जाधव, अमृत कर्पे, प्रविण कांबळे, अमित माने, शिवाजी भिसे, प्रविण पवार, तसेच सातारा तालुका पोलीस ठाणेचे
पो.हे.कॉ. किरण निकम, पो.कॉ. झनकर, गायकवाड यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाईत सहभागी अधिकारी व
अंमलदार यांचे श्री तुषार दोशी, पोलीस अधिक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधिक्षक सातारा यांनी
अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments