सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
महावितरण फलटण विभाग कामगार मेळावा संपन्न.
महावितरण फलटण विभाग , विद्युत अप्रेंटिस सेवा सोसायटी व वीज कंत्राटी कामगार संघटना सातारा यांच्या वतीने आऊटसोर्सिंग कामगारांना सुरक्षा साधनांचे वाटप, मोफत वैद्यकीय तपासणी व कामगार मेळावा संपन्न...
महावितरण कंपनी सातारा सर्कलमधील फलटण विभागांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना महावितरण फलटण विभाग , विद्युत अप्रेंटिस सेवा सोसायटी व वर्कर्स फेडरेशन संलग्न वीज कंत्राटी कामगार संघटना सातारा यांच्या वतीने दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सूर्याची गार्डन मंगल कार्यालय फलटण येथे कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन , श्री श्रीकृष्ण वायदंडे साहेब प्र. मुख्य औद्योगिक संबंधित अधिकारी बारामती झोन , फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रदीप ग्रामोपाध्ये साहेब , अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री सचिन मोकाशी साहेब , मा. डॉ. श्री भारत नागरे साहेब ESIC दवाखाना फलटण यांच्या अध्यक्षतेखाली व महावितरण मधील सर्व अधिकारी , कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये कंत्राटी वीज कामगारांना सुरक्षा साधनांचे वाटप, मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वितरण शिबिर तसेच महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदी निवड झालेल्या बाहयस्तोत्र कामगाराचा सत्कार, जे कंत्राटी कामगार सेवानिवृत्ती झालेले आहेत त्यांचे सपत्नीक सत्कार व कंत्राटी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक श्रीकृष्ण वायदंडे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी बारामती परिमंडळ,कॉम्रेड नाना सोनवलकर संयुक्त सचिव वर्कर्स फेडरेशन, श्री.सचिन मोकाशी अतिरिक्त कार्यकारी अभियंता फलटण,डॉक्टर भारत नागरे प्रभारी वैद्यकीय अधिकारी ईएसआय सेवा दवाखाना फलटण,श्री. बाळू लोंढे, अतिरीक्त कार्यकारी अभियंता, फलटण शहर ,
श्री. प्रदीप देहरकर, उपकार्यकारी अभियंता, फलटण ग्रामीण उपविभाग,
श्री. शिवाजी रेड्डी, उपकार्यकारी अभियंता लोणंद उपविभाग,
श्री. फुलचंद फड, उपकार्यकारी अभियंता, खंडाळा उपविभाग,
कॉ. दत्ता पाटील राज्यसचिव वीज कंत्राटी कामगार संघटना,कॉ. सोमनाथ गोडसे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना, कॉ. सतिश टिळेकर उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना,कॉ. माऊली गाढवे, सातारा जिल्हाध्यक्ष वीज कंत्राटी कामगार संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
व्यासपीठावरील मान्यवर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड सतिश टिळेकर यांनी करताना विद्युत अप्रेंटिस सेवा सोसायटी व वीज कंत्राटी कामगार संघटना कंत्राटी कामगारांसाठी स्तुत्य उपक्रम राबवून कामगारांसाठी अहोरात्र सर्वतोपरी मदत करत असतात. तसेच संस्थेचे व संघटनेचे कामकाज कशा पद्धतीने पारदर्शकपणे चालविण्यात येत आहे याबाबत विस्तृत माहिती दिली.या कार्यक्रमांमध्ये महावितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यक पदी निवड झालेल्या कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगाराचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विशेष करून महावितरण कंपनीच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले कंत्राटी कामगार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. मेळाव्यात शेकडो कामगारांना सुरक्षा साधने झुला, सेफ्टी हेल्मेट,हॅन्ड ग्लोज, लाईन टेस्टर ,टेस्टर,पक्कड व स्क्रू ड्रायव्हर या इत्यादी साधनाचे सर्वांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
मेळाव्यास कॉ. सोमनाथ गोडसे,कॉ. दत्ता पाटील,कॉ.नाना सोनवलकर,श्री.सचिन मोकाशी साहेब, डॉ. भारत नागरे व श्री श्रीकृष्ण वायदंडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये कॉ. कृष्णा भोयर साहेब यांनी मेळाव्यात संबोधित करताना म्हणाले की,विद्युत मंडळ व नंतरच्या वीज कंपन्या मधील अप्रेंटिस यांना नोकरी मिळण्याकरिता वर्कर्स फेडरेशन संघटनेने संघर्ष केला.त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगाराची भरती सुरू झाल्यामुळे कंत्राटी कामगारांच्या कामाचा प्रश्न संघटनेने हातात घेतला व संघटनेने १७ दिवस प्रकाशगडच्या पुढे आंदोलन केल्यामुळे श्री.मनोज रानडे कमिटीचे गठन झाले. त्यानंतर समान काम समान वेतन करीता आंदोलन केल्यानंतर श्रीमती अनुराधा भाटिया कमिटीचे गठण झाले. या दोन्ही कमिटीचे रिपोर्ट शासनास गेले. वीज कंपन्या मधील कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यायला पाहिजे होता मात्र तो घेतलेला नाही.
महाराष्ट्रात नव्हे तर देशातील सर्व सार्वजनिक उद्योगात राज्य सरकारमध्ये कंत्राटी कामगारांची भरती केलेली आहे. कंत्राटी पद्धतीने भरती करून कामगारांचे आर्थिक व सामाजिक शोषण सध्या सुरू आहे. समान काम समान वेतनाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सुद्धा राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. कंत्राटी कामगारांना कामगार संघटनांच्या मागणीमुळे दोन वेळा पगारवाढ मिळाली.आजही अनेक कंत्राटी कामगारांना इतर ठिकाणी त्यांना महावितरण कंपनी देत असलेले वेतन अदा करत नाही. परंतु फलटण विभागांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन, पीएफ , वैद्यकीय सुविधा तत्परतेने पुरवल्या जातात या सर्व गोष्टींचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले
कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत वारंवार कामगार संघटनांनी मागणी करून सुद्धा त्या दिशेने राज्य सरकारची वाटचाल नाही. देशातील सार्वजनिक उद्योग हा सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे.वीज उद्योगाला वाचवणं ही सुद्धा कामगार संघटना म्हणून आपली जबाबदारी आहे.
मेळाव्याला सातारा जिल्ह्यामधून ५०० च्या वर कंत्राटी कामगार उपस्थित होते. मेळावा आयोजित करण्याकरीता
काॅ.सतिश जाधव , सचिन जाधव, संतोष कुंभार,रजनीकांत सोनवणे , दत्तात्रय नरुटे, सुहास बनकर, श्री निलेश लंभाते, श्री राजेन्द्र इमडे, श्री तुषार सोनवलकर, श्री करण दडस, श्री निखिल सुतार, श्री जनार्दन टेंबरे, श्री सचिन कुंभार, श्री बाळासाहेब टिळेकर, श्री स्वप्निल जाधव
श्री निलेश दंडीले, श्री सचिन फुले, श्री देवानंद सोनवलकर, श्री राहुल निंबाळकर, श्री धनाजी तरडे, श्री बापू जगदाळे
श्री प्रविण वाघ, श्री भारत बनकर, श्री प्रमोद सोनवणे, श्री महादेव जगदाळे, श्री नरेंद्र बुणगे, श्री अजय जाधव
श्री बाळासाहेब कराड, श्री ओंकार गुलदगड, श्री विजय जाधव, श्री आदित्य गायकवाड, श्री दत्तात्रय जाधव, श्री अमर मोरे
महिने प्रतिनिधी - फैमिदा मेटकरी, अहिल्यादेवी लोकरे, नेहा शहा, अश्विनी गोडसे, प्रतिक्षा कदम , शितल किरटक्के
सर्व व्यवस्थापक, पदाधिकारी, सर्व सभासद वर्कस फेडरेशन संलग्न वीज कंत्राटी कामगार संघटना फलटण , विद्युत अप्रेंटिस सेवा फलटण विभाग व विज मंडळ संस्था सातारा
इत्यादी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम झाल्यानंतर स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment
0 Comments