Type Here to Get Search Results !

साखरवाडी पंचायत समिती गणातुन कु.शिवांजली विक्रमसिंह भोसले मैदानात उतरणार..!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/दादा जाधव

साखरवाडी पंचायत समिती गणातुन कु.शिवांजली विक्रमसिंह भोसले मैदानात उतरणार..!


फलटण तालुक्यात नवा राजकीय रंग – विक्रमसिंह भोसले यांची कन्या शिवांजली मैदानात उतरणार?

फलटण तालुक्यातील साखरवाडी गणामध्ये यंदा जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाल्याने विक्रमसिंह आप्पा भोसले यांना उमेदवारी घेता येणार नाही. मात्र पंचायत समितीला ओबीसी महिला आरक्षण मिळाले असून, सभापती पदही ओबीसी महिलेसाठी राखीव आहे.

राजकारणात आक्रमक, अभ्यासू व विकासाभिमुख नेता म्हणून ओळख असलेले विक्रमसिंह भोसले आता त्यांच्या उच्चशिक्षित युवा नेतृत्व शिवांजली विक्रमसिंह भोसले यांना मैदानात उतरवतील अशी चर्चा सध्या साखरवाडी परिसरात रंगली आहे.

अजितदादा पवार, आणि रणजीतदादा निंबाळकर यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या विक्रमसिंह भोसले यांच्या कडून ग्रामस्थांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.

गावकऱ्यांच्या चर्चेत एकच प्रश्न — “या वेळेस साखरवाडी गणात तरुणी नेतृत्वाची नवी पिढी उदयास येणार का?”

Post a Comment

0 Comments