सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/अजय संकपाळ
पाडेगाव गणातून निवडणूक लढवण्याची तयारी -रमेश दगडू बोंद्रे यांची घोषणा.
वरिष्ठांच्याकडुन संधी मिळाल्यास ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार.
फलटण तालुक्यातील तरडगाव जिल्हा परिषद गटामधील पाडेगाव पंचायत समिती गणासाठी यंदा सर्वसाधारण (सामान्य) आरक्षण घोषित झाले असून, या पार्श्वभूमीवर या गणातून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक, मुरूम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक रमेश दगडू बोंद्रे यांनी सांगितले आहे.
रमेश बोंद्रे यांनी सांगितले की, “पाडेगाव गणात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने मी या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मला राजकारणातील कामाचा दीर्घ अनुभव आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात सातत्याने कार्य केले असून गावोगाव लोकसेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास संपादन करून विकासाभिमुख कार्य घडवून आणण्याचा माझा प्रयत्न राहील ते पुढे म्हणाले, “विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास मी या ठिकाणाहून संपूर्ण ताकदीने आणि जनतेच्या विश्वासाने निवडणूक लढवणार आहे.”पाडेगाव गणामध्ये रमेश बोंद्रे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली असून, स्थानिक स्तरावर त्यांना चांगला जनाधार असल्याचे बोलले जात आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी कार्य केले असल्याने कार्यकर्त्यांचा मोठा संपर्कवर्तुळ त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.राजकीय वर्तुळात त्यांच्या या घोषणेमुळे पाडेगाव गणातील निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे.

Post a Comment
0 Comments