Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यात दिवाळीचा सण, अतिवृष्टीच्या संकटाचे सावटाखाली.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

गिरवी/अनिलकुमार कदम 

फलटण तालुक्यात दिवाळीचा सण, अतिवृष्टीच्या संकटाचे सावटाखाली.



फलटण ( प्रतिनिधी ) फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मे ते ऑक्टोबर दरम्यानच्या कालावधीत अतिवृष्टीमुळे संततधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.शेतं वाहून गेली पण फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.त्यामुळे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी करण्यासाठी पैशाची चणचण टंचाई निर्माण झाली आहे.आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होऊन सुद्धा फलटण तालुक्याचा अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शासन यादीत समावेश नसल्याने फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक नुकसान भरपाई पासून वंचित राहवे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक संकटाच्या सावटाखाली सापडली आहे.

शहरातील व ग्रामीण भागातील धनिकांच्या दिवाळीच्या झगमगाटात व आताशबाजीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दु:खाची व संकटात सापडलेल्या बळीराजाची काळजी राज्यकारभार करणार्या राज्यकर्त्यांना दिसून येत नाही हि भारतीय लोकशाही मधील शोकांतिका आहे.


वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे वेळापत्रक कोलमडले आहे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला आहे.शेतकरी दिवाळीच्या सणासुदीला संकटातून मार्ग काढण्यासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज काढून मुलाबाळांना गोडधोड पदार्थ बनवण्याची अडापिटा करताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments