सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत ( सर)
साखरवाडी जिल्हा परिषद गटातून सौ उज्वला हरिष गायकवाड निवडणूक लढवण्यास ईच्छुक.
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी साखरवाडी जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती (महिला ) म्हणून राखीव असून या गटातून आपण निवडणूक लढवण्यास ईच्छुक असल्याचे सौ उज्वला हरिष गायकवाड यांनी म्हंटले असून प्रमुख पक्षांनी उमेदवारी देऊन गेल्या अनेक निवडणुकांमधून बौद्ध समाजाला जाणीवपूर्वक वगळल्याची उणीव यानिमित्ताने भरून काढावी असे विनंती वजा आवाहन सौ गायकवाड आणि साखरवाडी परिसरातील बौद्ध बांधवांनी केले आहे. सौ उज्ज्वला गायकवाड या उच्चविद्याविभूषित असून आपले पती विद्यमान साखरवाडी ग्रामपंचायत सदस्य श्री हरिष कमलाकर गायकवाड यांचे सोबत अनेक सार्वजनिक आणि समाज उपयोगी कार्यात नेहमी अग्रेसर आहेत. साखरवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळेत अनेक गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी , त्यांच्या शिक्षणासाठी त्या सतत कार्यरत असतात.आश्रम शाळेत शिकलेली अनेक मुले आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्याचबरोबर साखरवाडी परिसरातील अनेक लाभार्थी व्यक्तींना घरकुल योजनेच्या माध्यमातून सुयोग्य मार्गदर्शन किंवा प्रसंगी जागा उपलब्ध करून देण्यात सौ गायकवाड दाम्पत्यांचे योगदान खूप मोलाचे आहे. दरवर्षी साखरवाडी परिसरातून आळंदी पंढरपूर पायी वारीसाठी जाणाऱ्या सर्व दिंड्याना भरीव सहकार्य करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपल्याला येणाऱ्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत साखरवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली तर अत्यंत सक्षमपणे आपण ती लढवू आणि जिंकून दाखवू असा ठाम विश्वास सौ गायकवाड यांनी बोलून दाखवला आहे.त्यांच्या या निर्धारात साखरवाडी आणि संपूर्ण जिल्हा परिषद गटातील आम्ही सर्वजण पाठीशी राहून प्रचंड मताधिक्याने सौ गायकवाड यांना निवडून आणू असा निर्धार युवक व समस्त नागरीक बंधू भगिनींनी केला आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी सौ गायकवाड आणि पर्यायाने आम्हाला सुयोग्य संधी देवून सहकार्य करावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments