Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरवाडी ( फलटण) परसबाग स्पर्धेत तालुक्यात प्रथम..

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरवाडी ( फलटण) परसबाग स्पर्धेत तालुक्यात प्रथम..


 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत सातारा जिल्हा परिषदेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात त्यापैकी शालेय पोषण आहार परसबाग हा एक उपक्रम. 

 सन 2025 - 26 या शैक्षणिक वर्षात परसबाग स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा फडतरवाडी यांनी सहभाग नोंदवला व या स्पर्धेत फलटण पंचायत समिती अंतर्गत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला .

शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री एम.डी.गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी श्रमदान करून सुंदर अशी परसबाग फुलवली या परसबागेतील भाजीपाल्याचा शालेय पोषण आहारात  नियमित वापर केला जातो.

 परसबागेत फळभाज्या पालेभाज्या फळे औषधी वनस्पती असे वेगवेगळे विभाग तयार करण्यात आलेले आहेत पोषण आहारात उपयोगी असणाऱ्या भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश या परसबागेत करण्यात आलेला आहे श्री एम.डी. गायकवाड सर, सौ छाया जाधव,श्री संजय जगदाळे,सौ जयश्री चव्हाण, श्री रोहन दळवे, सौ आशा वाघमारे,सौ निकिता फडतरे आणि इयत्ता सहावी, सातवी चे सर्व विद्यार्थी यांच्या कष्टातून ही परसबाग स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचण्यास मदत झाली .फडतरवाडी गावच्या सरपंच सौ. पौर्णिमा काटे, उपसरपंच श्री अमोल फडतरे, श्री अनुराज नलवडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक दिवसे, उपाध्यक्ष सौ.सुजाता कर्वे आणि सर्व सदस्य या सर्वांचे या कामी सहकार्य लाभले.

 पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री मठपती साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी पारसे साहेब, केंद्रप्रमुख सोमनाथ लोखंडे साहेब,तसेच दमयंती कुंभार मॅडम यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments