सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मुरुम विकास सोसायटीचा शताब्दी महोत्सव उत्साहात.
मुरूम विकास सोसायटी .लि मुरूम या संस्थेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने शताब्दी महोत्सव सोहळा आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या प्रसंगी अध्यक्ष स्थानी फलटण कोरेगाव मतदार संघाचे माजी आमदार दिपकराव चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
सदर या संस्थेची स्थापना १९२६ मध्ये कै.सोपानराव अमृता बोंद्रे यांनी केली या संस्थेची सो मालकीची सुसज्ज अशी इमारत असून संस्था गेल्या १९ वर्षापासून संगणीकृत आहे व संस्थेच्या नफा वाटणीतून तरतूद करून ऑफिस फर्निचर व संचालक मंडळ सभागृह उभे केले आहे दरवर्षी संस्था सभासदांना लाभांश वाटप केले जाते तसेच सभासदांना वेळेत कर्ज पुरवठा केला जातो व संस्थेचे कार्यालय सुट्टी व्यतिरिक्त चालू असते व संस्थेचे कर्मचारी नियमित कामावर असतात अशा या संस्थेचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना संजीवराजे म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मालोजीराजे यांनी सहकाराची पाळमुळे रुजवली व लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदर कर्ज परवठा केला जात होता.
श्रीमंत रामराजे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जागतिक तापमान वाढीमुळे आपली शेती ही संपण्याच्या मार्गावर चालली असुन याचा गांभीर्याने कोणीही विचार करत नाही. त्यासाठी आपल्याला झाडे लावावीच लागतील अन्यथा आपले भविष्य हे अंधकारमय होईल.या जागतिक तापमान वाढी बद्दल कोणीही बोलायला तयार नाही.आपली शेती व आपले भविष्य जर उज्वल बनवायचे असेल तर प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे जतन करावेच लागेल.माजी आमदार दिपकराव चव्हाण म्हणाले की यशस्वीपणे १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या सोसायटी फारच कमी आहेत. मुरूम सोसायटीचे काम हे कौतुकास्पदच आहे. सभासदांना लाभांश वाटण्यात आला परंतु जर साखरवाडी कारखाना चालू झाला नसता तर हा लाभांश सुद्धा वाटता आला नसता. साखरवाडी येथील साखर कारखान्यांचा प्रश्न श्रीमंत रामराजे यांनी व्यवस्थित सोडवल्यामुळे योग्यवेळी शेतकऱ्यांचा ऊस जाऊन योग्यवेळी त्यांचे बिल मिळत असल्याने सहकारी सेवा सोसायटीला उभारी मिळाली आहे.
याप्रसंगी फलटण पं.समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, रेश्माताई भोसले,श्रीराम सह.साखर कारखान्याचे व्हाॅ.चेअरमन नितीन शाहुराजे भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर,होळ सोसायटीचे माजी चेअरमन सुधीर भोसले, श्रीराम सह.साखर कारखान्याचे संचालक रमेश बोंद्रे,खराडेवाडीचे माजी सरपंच रविंद्र टिळेकर (सर), खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव नाईक निंबाळकर(तात्या), सातारा जि.प.मा. सदस्य धैर्यशील उर्फ दत्ताबापु अनपट,पं.स.समिती माजी उपसभापती महादेव बोंद्रे, तसेच सोसायटीचे चेअरमन, व्हाॅ.चेअरमन सर्व संचालक सभासद व पंचक्रोशीतील सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment
0 Comments