सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण तालुक्यातील १८ गावातील खंडकरी शेतकऱ्यांनी केलीआपल्या ३० वर्षाच्या खंडाची मागणी..श्रीमंत रामराजे समितीच्या माध्यमातून आजपर्यंत खंडकरी शेतकऱ्यांना मिळाला न्याय ..
फलटण तालुक्यातील १८ गावातील सर्व खंडकरी शेतकऱ्यांची बैठक दि- २९
सप्टेंबर रोजी शेती महामंडळ ऑफिस, ५ सर्कल साखरवाडी येथे पार पडली. त्यात
सर्व खंडकरी शेतकऱ्यांनी आपल्या मागील ३० वर्षाच्या खंडाची मागणी केली. सदरचे
मागणी अर्ज सर्व खंडकरी शेतकऱ्यांनी शेती महामंडळ ऑफिस येथे श्री. सुनील बनकर
यांच्याकडे दिले तसेच मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य
मुंबई यांच्याकडे पोस्टाने पाठविले आहेत.
सदरच्या बैठकीत खंडकरी शेतकऱ्यांनी खंडकरी शेतकऱ्यांचे नेते, महाराष्ट्र राज्य
खंडकरी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. लक्ष्मणराव नाईक निंबाळकर यांनी
मांडलेले ठराव सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात सहमत केले. ते ठराव खालीलप्रमाणे
ठराव क्रं - १
१ एकराच्या आतील १२९ खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीची वाटप प्रक्रिया त्वरित
पूर्ण करणेच्या दृष्टीने मा- जिल्हाधिकारी सातारा यांनी शेतकर्या समावेत त्वरित आढावा
बैठक घेण्यात यावी.
ठराव क्रं - २
रावडी ते राजाळे पर्यंत च्या सर्व सर्कल वरील महामंडळा च्या कामगारांना श्रीमंत
रामराजे समितीच्या शिफारशीप्रमाणे प्रत्येकी २.५ गुंठे जागा देण्याच्या कामगारांच्या
मागणीला खंडकरी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे
वरील ठरावास सुखदेव बेलदार- पाटील सरडे, सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे
माजी चेअरमन राजवर्धन शिंदे, लालासाहेब फडतरे, प्रा. विलासराव बोबडे, डी . डी.
वाघमोडे, जयकुमार रणवरे, जगन्नाथ धुमाळ, मानसिंगराव खानविलकर, किसनराव
झेंडे, हरिभाऊ रुपनवर सादिक पठाण, अमोल संकपाळ दिलीप पवार, चंद्रशेखर
चव्हाण, भीमराव जाधव, राजेंद्र भोसले, हिंदुराव वारे पी. एन. बोन्द्रे यांनी पाठिंबा
दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात बागाईत भागातील १८ गावातील खंडकरी शेतकरी
उपस्थित होते
,

Post a Comment
0 Comments