Type Here to Get Search Results !

क्रीडा क्षेत्रात सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साखरवाडीची गरुड झेप.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

क्रीडा क्षेत्रात सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साखरवाडीची गरुड झेप.


साखरवाडी - मंगळवार , दि. 30/09/2025 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने छत्रपती शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धा संपन्न झाल्या.  या स्पर्धेमध्ये सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज किमान कौशल्य विभाग साखरवाडी मधील कु. शिवानी दादा जाधव  हिने 60 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . तसेच कु.परिधी सतीश काकडे हिला 56 किलो वजन गटात तृतीय क्रमांक प्राप्त झाला.याप्रसंगी स्कूल कमिटीचे चेअरमन श्री भोजराज नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमन श्री राजाराम बबनसो नाईक निंबाळकर , स्कूल कमिटी सदस्य,प्रशालेचे प्राचार्य श्री गोपाळराव जाधव सर,  शिक्षक,  शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री. तांबे सर यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments