Type Here to Get Search Results !

शालेय खो खो स्पर्धेत साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या १४ वर्षाखालील मुलींना जिल्हास्तरावर विजेतेपद ...विभागीय स्पर्धेसाठी निवड.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/हरिदास सावंत (सर)

शालेय खो खो स्पर्धेत साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या १४ वर्षाखालील मुलींना  जिल्हास्तरावर विजेतेपद ...विभागीय स्पर्धेसाठी निवड.


 खो खो पंढरी म्हणून सर्वश्रूत असलेल्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग , साखरवाडी ( तालुका फलटण , जिल्हा सातारा) या विद्यालयातील १४ वर्षांखालील मुलींच्या खो खो संघाने शालेय क्रीडा संचलनालय आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले आणि या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.साखरवाडी शिक्षण संस्थेचे नव निर्वाचित संचालक माननीय श्री माणिक आप्पा शिवराम भोसले यांचे शुभहस्ते या सर्व खेळाडू विद्यार्थिनींना आणि त्यांचे मार्गदर्शक श्री रोहिदास गावित 

आणि श्री कमलाकर गांगुर्डे यांना सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद रावजी साळुंखे - पाटील , संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे - पाटील , संचालक माननीय श्री राजेंद्र शेवाळे , संस्था सचिव तथा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ उर्मिलाताई जगदाळे , विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी , सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि काही माजी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयातील मुलींनी मिळवलेल्या या विजेते पदाचे साखरवाडी परिसरातून विशेष अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments