सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
खुनाचा प्रयत्न केलेने आरोपीस १० वर्षे शिक्षा व रु.१.१०,०००/- दंडाची शिक्षा.
सातारा - मौजे गणेशवाडी दि २५/०७/२०१८ रोजी दुपारी १३.०० वा. चं मुमारास आरोपी नाम मारुती तात्याबा साळुंखे वय
७० वर्षे रा. गणेशवाडी ता. जि. सातारा याने फिर्यादी यांचे वडील (जखमी) संतोष राजाराम जाधव वय ४५ वर्षे रा. गणेशवाडी
ता. जि. सातारा यांचे आरोपीचे पत्नी बरोबर अनैतिक संबंध आहेत असा गैरसमज करून घेऊन जखमी हा त्याचे मोटार सायकलवरुन
गावातील पाराजवळ आला असता यातील आरोपीने त्यास जिवे व टार मारणेचे उद्देशाने आपल्या हातातील कुन्हाडीनं त्याचं मानंबर,
डोक्यावर वार केले म्हणून वगैरे अशी मजकुराची फिर्याद बोरगाव पोलीस स्टेशनला रोज दाखल करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोउनि एम. ए. खान वोरगाव पोलीस स्टेशन यांनी तपास करुन मा.न्यायालयात दोषारोप
पत्र पाठवण्यात आले होते.
सदरचा खटला मा. श्री. एस. आर. तांबोळी सो, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग- २ सातारा यांचे कोटांत चालला
होता. सरकारतर्फे श्री. महेश कुलकर्णी जिल्हा व सरकारी वकील, सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. नमुद कंसमध्ये एकुण
०७ साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच अन्य साक्षीदारांचे साक्षीवरून व जिल्हा व सरकारी
वकील यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत मा. श्री. एस. आर. तांबोळी सो, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग-
२ सातारा यांनी आज दि.०८/१०/२०२५ रोजी यातील आरोपी यास भा.द.सं. कलम ३०७ प्रमाणे दोषी ठरवण्यात आले आहे. व
त्यास १० वर्षे सश्रम करावास व १,१०,०००/- रुपये दंड दंड न भरल्यास ०६ महिने साधा कारावास अशी शिक्षा दिलेली आहे.
यातील १,००,०००/- रुपये दंडाची रक्कम ही फिर्यादीस देणेत यावी.)
मा. श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राजीव नवले
उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा व श्री. धोंडीराम वाळवेकर सहा. पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस स्टेशन
प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन पो. अं.ब.नं. ३०६ प्रमोद फंरादे व पो. अं.व.नं. ११५५ विश्वनाथ
आंब्राळे वोरगाव पोलीस स्टेशन यांनी कामकाज पाहिले.
याकामी पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय पाटील, श्रेणी पोउनि अरविंद बांदल, श्रेणी
पोउन शशीकांत गोळे, सफी. गजानन फेरादे, पो.हवा. परशुराम वाघमारे, म.पो.हवा. रहिनावी शेख, पो. अं. गजानन फडतरे यांनी योग्य ती मदत केली.

Post a Comment
0 Comments