सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सरदार वल्लभभाई हाय. व ज्युनि. कॉलेज किमान कौशल्य विभाग, साखरवाडीच्या खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रात उज्वल यश.
. साखरवाडी :- जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज किमान कौशल्य विभाग साखरवाडी या प्रशालेचे खेळाडू कु. भाग्यश्री राजेंद्र टिळेकर व कु. वैष्णवी नंदकिशोर लगड यांना सुवर्ण पदक,
कु. कल्याणी नवनाथ बोडरे , कु. परिधी सतीश काकडे, कु. अमृता नवनाथ बोडरे , कु. शिवानी दादा जाधव यांना रौप्य पदक तसेच
कु. आराध्या आनंद गायकवाड आणि कु.आयशा समीर सय्यद यांना कांस्य पदके प्राप्त झाले. सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंची विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली.याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , सेक्रेटरी साहेब श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. भोजराज नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमन श्री. राजाराम बबनसो नाईक निंबाळकर , स्कूल कमिटी सदस्य, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर , तपासणी अधिकारी श्री. दिलीप राजगुडा , सहाय्यक तपासणी अधिकारी श्री. सुधीर अहिवळे , प्रशालेचे प्राचार्य श्री. गोपाळराव जाधव , शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री. नानासो तांबे सर व श्री जनार्दन पवार सर यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment
0 Comments